मुंडीपार ग्रामपंचायतीला मिळाले आयएसओ नामांकन प्रमाणपत्र

0
39

गोरेगांवः-तालुक्यातील मुंडीपार ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण संस्था पातळीवर नुकतेच करण्यात आले होते. या ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद सदस्य डॉ.लक्ष्मण भगत,गोरेगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, विस्तार अधिकारी(पंचायत)टी.डी.बिसेन, यांच्या हस्ते आय.एस.ओ.9001-2015 मानांकनाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामुळे मुंडीपार ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वर्गाचे कौतुक होत आहे. येथील ग्रामस्थांना मूलभूत व प्राथमिक सेवा सुविधा पुरविण्याचे काम मुंडीपार ग्रामपंचायतीकडून होत आहे. आय.एस.ओ. मानांकनाचे प्रमाणपत्र स्विकारतांनी मुंडीपार ग्रामपंचायतीचे सरपंच सुमेंद्र धमगाये,उपसरपंच जावेद खान, ग्रामसेवक अरविंद साखरे, तंमुसअध्यक्ष गिरीश पारधी,ग्रा.पं.सदस्य दिनेश दिक्षीत,छंदीप ठाकुर, शिला चौधरी,भुमिता भगत,माजी तंमुसअध्यक्ष नामदेव नेवारे,तलाठी धमगाये, मुख्याध्यापक एस.एम.काठेवार, सर्व ग्रा.पं.कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुंडीपार ग्रामपंचायत सर्व निकषावर खरी उतरली आहे. आय.एस.ओ. मानांकन पथकाने केलेल्या पाहणीत मुंडीपार ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत, ग्रामपंचायतीचे नियमित दप्तर व आर्थिक तपासणी (ऑडिट), ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कक्षाची मांडणी, गावाची स्वच्छता, रस्ते, अंगणवाडी, शैक्षणिक सेवा सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य आदींची पाहणी करून गुणांकन ठरविले. ग्रामपंचायत स्तरावर विविध शासकीय योजना व उपक्रम राबवून गावाचा सर्वांगीणदृष्ट्या विकास साधला आहे. गावाचा विकास साधत असतांना ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत केलेले कार्य व राबविलेले लोकोपयोगी उपक्रम, शासकीय कामातील सहभाग वाखाणण्याजोगा राहिला आहे. येथील नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवासुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने शासकीय योजनांची योग्यप्रकारे अंलबजावणी केली. ग्रामस्थांच्या सहकार्या मुळेच गावाच्या प्रगतीशील वाटचालीत महत्त्वपूर्ण लोकसहभाग लाभला आहे. ग्रामपंचायत कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या मेहनतीचे हे फलित आहे, अशी माहिती सरपंच सुमेंद्र धमगाये यांनी दिली.