श्रीमती प्रभाताई अरुण मराठे यांचे निधन

0
19

अमरावती, दि. 29 : दै.हिंदुस्थान व मराठे कुटूंबियांच्या आधारवड पत्रमहर्षि स्व.बाळासाहेब मराठे यांच्या ज्येष्ठ स्नुषा व दै.हिंदुस्थानचे दिवंगत संपादक स्व.अरुण मराठे यांच्या पत्नी श्रीमती प्रभाताई अरुण मराठे यांचे बुधवारी (दि.२८) सायंकाळी ७.१५ वाजताच्या दरम्यान निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात प्रमोद, विनोद, विलास व विवेक ही चार मुले, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा (दि.२९)गुरुवारी दुपारी १२ वाजता विलास मराठे यांचे निवासस्थान,प्रतापगढ़ अपार्टमेंट, खापर्डे बगीचा येथून निघेल व स्थानिक मोक्षधामावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, आपले सासरे व पती यांच्या कडून मिळालेला सामाजिक वारसा श्रीमती प्रभाताई मराठे यांनी अखेरपर्यंत जोपासला होता. तपोवन येथील विदर्भ महारोगी सेवा मंडळासह अनेक महिला व सामाजिक संघटनांशी त्यांचा जवळचा संबध होता. विदर्भातील अग्रगण्य दै. हिंदुस्थान च्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.