Home विदर्भ पालकमंत्री संजय राठोड यांची शिरपूर (जैन) ला भेट 

पालकमंत्री संजय राठोड यांची शिरपूर (जैन) ला भेट 

0
वाशिम दि.२ –पालकमंत्री संजय राठोड यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच आज २ ऑक्टोबर रोजी मालेगाव तालुक्यातील शिरपूर (जैन) येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी निकलंक निकेतन येथे चातुर्मासानिमित्ताने शिरपुर येथे आलेले जैनमुनी आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे दर्शन घेतले.यावेळी सिद्धांत सागरजी महाराज,जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व चातुर्मास आयोजन समितीचे पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
          शिरपूर (जैन ) येथील अंजली वाढे या मुलीने गरीब परिस्थितीवर मात करून कठोर परिश्रमातून आयआयटी प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण केल्याने पवई,मुंबई येथील आयआयटी संस्थेत निवड झाल्याबद्दल निकलंक निकेतन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अंजलीचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी अंजलीचे वडील संतोष वाढे व आई मीरा वाढे तसेच चातुर्मास आयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
          पालकमंत्री संजय राठोड यांनी शिरपूर (जैन) ग्रामपंचायतला भेट दिली.या भेटीदरम्यान सरपंच राजकन्या अढागळे व ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.येत्या दोन वर्षात शिरपूर(जैन) गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री श्री. राठोड यांनी सत्काराला उत्तर देताना दिली.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी समिती सभापती विश्वनाथ सानप व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.बालब्रह्मचारी तात्या भैय्या यांनी हातमाग व चातुर्मासाबद्दल पालकमंत्र्यांना माहिती दिली.

Exit mobile version