गोर बंजारा परिवार गोंदिया जिल्हा *जिल्हा कार्यकारणी गठीत* 

0
28
गोंदिया,दि.03ः-वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य  (ट्रेड युनियन) अध्यक्ष अमर  राठोड यांच्या आदेशाने गोर बंजारा परिवार गोंदिया जिल्हा कार्यकारणीचे गठण गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाला राजूभाऊ चव्हाण (सरचिटणीस),मनोज राठोड(सहसचिव),किशोर जाधव(विभागीय संघटक),दिनेश पवार(संघटक नागपूर),भरत राठोड तुमसर,माजी जिल्हा अध्यक्ष डॉ.बाबुसिंग राठोड व कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय राठोड यांच्यासह गोंदिया जिल्ह्यात कार्यरत बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.सगळ्यांच्या सहमतीने जिल्हाध्यक्ष पदी महेश राठोड यांची निवड करण्यात आली.तसेच सचिव पदावर प्रदीप राठोड,मनोज चव्हाण (कार्याध्यक्ष),विलास राठोड (कोषाध्यक्ष),सुनील जाधव,शिवाजी राठोड (उपाध्यक्ष),ज्ञानेश्वर राठोड संघटक,मधुकर जाधव सहसचिव,दिलीप राठोड प्रसिद्धी प्रमुख,संजय राठोड,डॉ बाबूसिंग राठोड व गणेश पवार मार्गदर्शक,किशोर मुळे कायदेतज्ञ यांचा समावेश आहे. 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर लढा मजबूत करून शासनाला जुनी पेन्शन देण्यास भाग पाडण्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.सर्व मोठ्या संख्येने उपस्थित कर्मचारी बांधवांनी नव्या कार्यकारणीला  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.