श्री सूर्या दव मांडोदेवी देवस्थान येथे १८०० ज्योत प्रज्वलित

0
23

दररोज 2000 पेक्षा जास्त भाविक घेतात दर्शन

सर्व भाविकांना महाप्रसादाचे उत्तम व्यवस्था

गोंदिया जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून उदयास

गोंदिया-गेल्या 30 वर्षाची परंपरा यंदाही पुढे सुरू ठेवत आमगाव तालुक्यातील येडा नजीक असलेल्या जागृत देवस्थान श्री सूर्यदेव मांडोबाई येथे यावर्षी नवरात्र निमित्त प्रज्वलित करण्यात आले असल्याची माहिती संस्थांचे सचिव तथा गोंदिया विधानसभाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली आहे तसेच सोमवारला सुरू या नवरात्रीमध्ये दररोज 2000 च्या पेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येत असून त्यांच्यासाठी संस्थांच्या वतीने उत्तम भोजनाचे व्यवस्था करण्यात येत असल्याचे माहिती सुद्धा यावेळी श्री अग्रवाल यांनी दिली आहे.

दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये नवरात्री हा पर्व मोठ्या भक्ती भावाने वास्तेने साजरा केला जातो. ठिकठिकाणी असलेल्या देवींच्या मंदिरात तसेच सार्वजनिक दुर्गा उत्सवाच्या मंडळामार्फत हा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो यात गोंदिया जिल्हा सुद्धा कोठेच कमी नसतो गोंदिया मध्ये नवरात्री मधील सर्व नऊ दिवसांमध्ये सार्वजनिक तथा दुर्गा मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे रेलचेल असते यातच आमगाव तालुक्यातील क्रीडा नजीक असलेल्या जागृत देवस्थान श्री सूर्यदेव मांडवा येथे सुद्धा हा भक्ती भावाने मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो येथे दरवर्षी निरंतर नऊ दिवस जळत राहणाऱ्या ज्योती कलर्स पेटवली जातात यावर्षी एकूण १८०० ज्योती कलश प्रज्वलित केली आहेत येथे दर्शनासाठी गोंदिया जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील व शेजारील राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात या येणाऱ्या भाविकांसाठी रोज नववी दिवस संस्थांच्या वतीने रोज महाप्रसादाची व्यवस्था केली जाते तसेच संपूर्ण नऊ दिवस भजन कीर्तन जागरण तसेच भागवत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते या यशस्वी आयोजनाच्या साठी संस्थानाचे अध्यक्ष श्री भैय्यालाल सिंधराम सचिव आमदार श्री विनोद अग्रवाल व व्यवस्थापक डॉक्टर लक्ष्मण भगत तसेच सर्व सदस्य मेहनत घेत असतात. यात योगराज्य धुर्वे शिवलालजी सराटे छंनुभाऊ काटेवार, श्यामभाऊ ब्राह्मणकर, तारेशजी कुबडे, सुंदर जी कापसे सुनीलजी पटले,मीताराम पालेवार, सुरेशजी सराटे तुलसीराम उईके, किशोरजी शेंडे, अमोलजी भारती, अर्चना भारती, चंद्रकलाबाई दोनोडे इत्यादी च्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवरात्रीच्या हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.