भंडारा, दि. 3 : जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित वैदयकीय व दंत आरोग्य शिबीराचे उदघाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.यावेळी खासदार सुनिल मेंढे,आमदार परिणय फुके यांच्यासह जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्य् चिकीत्सक डॉ.दीपक सोयाम,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर उपस्थित होते.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियांतर्गत जिल्हयात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी पालकमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात पाच दिव्यांगाना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्याना कार्ड वितरीत करण्यात आले.आरोग्य विषयक स्टॉलची पाहणी देखील पालकमंत्र्यांनी केले.चार दिवस चालणा-या या आरोग्य शिबीरात आज पहील्याच दिवशी एक हजारहून अधिक रूग्णांनी नोंदणी केली आहे.