इरई नदीच्या खोलीकरणासाठी पदयात्रा व जल सत्याग्रह

0
15

चंद्रपूर-अनेक वर्षांपासून आरवट पूल ते पठाणपुरा गेट-विट्ठल मंदिर-गोपालपुरी-बिनबा गेट-नागिनाबाग-सिस्टर कॉलोनी, हवेली गार्डन, वडगाव, दाताळा परिसरात इरई नदीचे पाणी पूर परिस्थितीत अनेकांच्या घरात शिरते त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठय़ा प्रमाणात फटका बसत असतो. पण, या पूर परिस्थितीला थांबविण्याकरिता आजपयर्ंत शासनाकडून खोलीकरण करण्याकरिता फक्त घोषणा केल्या जात आहे आणि छोटा मोठा फंड देऊन फक्त काम सुरू केल्या जात असते. पण, ते संपूर्ण काम शेवटपयर्ंत नेण्यात येत नाही. त्यामुळे शासनाच्या उदासीनतेमुळे नेहमीच या परिसरात पुराची परिस्थिती निर्माण होत असते. याच परिस्थितीची आम आदमी पक्षाकडून सदर परिसरात नदी पात्रात मोठय़ा प्रमाणात खोलीकरणाचे काम करण्यात यावे व विशेष निधी उपलब्ध करून खोलीकरण करून सदर परिसरातील नागरिकांना न्याय मिळावा, या मागणीला घेऊन एक मोठे जल सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वृषाईचे कुशाब कायरकर यांच्यासोबत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, शहर सचिव राजू कूडे, शहर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे, झोन अध्यक्ष सुनील सदभय्या, शहर संघटन मंत्री सुनील भोयर, जिल्हा ऑटो युनियन अध्यक्ष शंकर धुमाळे, युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे, झोन अध्यक्ष रहेमान खान, योगेश गोखरे, सुधीर पाटिल, नागसेन लभाने, प्रदीप वाळके, सचिन खोबरागडे, मधुकर साखरकर, डॉ. सलीम तुकडी, योगेश मुरेकर, गजानन बनसोडे, अशोक माहूरकर, प्रशांत रामटेके, स्वप्निल घागरगुंडे, जितेंद्र कुमार भाटिया, आर. धवले, प्रफुल्ल मल्लेलवार, पुंडलिक गोठे, दीपक चुनारकर, रामदास साखरकर, विठ्ठल भगत, रामकृष्ण खामनकर सोबत महिला संघटनमंत्री सुजाता बोदेले, रूपाली टोंगे, पल्लवी घोडमारे, रेखा चांभारे, इंदिरा गुरुले,गीता अत्रे, प्रीती लांडे, उज्वला नांदे, सपना चांभारे, सारिका जाधव, प्रतिभा कायरकर, सुजाता देठे आदी उपस्थित होते.