दसरा सणानिमित्त आरोग्य विभागाचा नाविन्यपूर्वक उपक्रम

0
27

विविध आजाराबाबतचा प्रतिकात्मक पुतळा दहन
गोंदिया-जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी गोंदियाच्या वतीने सर्व संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे दहन करण्याच्या अनुषंगाने आजाराबाबतचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याचे दहा तोंडाला दहा आजारांचे नाव देऊन तो दहन करण्याचा उपक्रम आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदिया, जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया, जिल्हा क्षयरोग विभाग, जिल्हा हिवताप विभाग यांच्या एकत्रित सहकार्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदियाच्या परिसरात पार पडला.
सदर कार्यक्रम उपक्रमाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये आजाराबाबत जनजाग्रुती करणे होता.आजार प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.पंकजभाऊ रहांगडाले यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती मा. यशवंत गणवीर, समाज कल्याण सभापती मा.पूजा सेठ, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. रोशन राऊत, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. सुशांकी  कापसे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मीना वट्टी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात यांच्या उपस्थित पार पडला. कार्यक्रम प्रसंगी आरोग्य विभाग जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा प्रशिक्षण केंद्र इ. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.