ग्रामविकासातूनच देशाची परीक्षा अन्यथा अवदशा.. आमदार मनोहर चंद्रिकापुरे

0
27

… ईटखेडा येथे विकास कामाचे भूमिपूजन..

अर्जुनी मोरगाव,दि.08ः- मी, माझे घर सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते याचप्रमाणे गावाच्या विकासासाठी अवघे गाव, ग्रामपंचायत सुंदर विकासात्मक दिसावे यासाठी सर्वपरी प्रयत्न केले पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामगीतेमध्ये गाव हा विश्वाच्या नकाशा, गावावरून देशाची परीक्षा ,गावाची भंगता अवदशा, येईल देशा असे म्हटले आहे. गावचे सरपंच ,उपसरपंच, सदस्य यांनी गावातील प्रत्येक नागरिकाचे हीत जोपासून विकास करायला हवे. अन्यथा अवदशा आल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना इटखेडा येथे केले.
ग्रामपंचायत इटखेडा येथे सिमेंट नाली व रस्ता बांधकामाची भूमिपूजन आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत मध्ये जनतेशी संवाद साधण्याकरता सभेचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्य पौर्णिमा उमाकांत ढेंगे, पंचायत समिती सदस्य भाग्यश्री सयाम, ग्रामपंचायत सदस्य कल्पना मनोज लोणारे, राकेश शेंडे माजी सरपंच उद्धव मेहंदळे व इतर उपस्थित होते.
आमदार चंद्रिकापुरे यांनी इटखेडा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जनतेच्या समस्या समजून घेतल्या लोकांनी वेळेवर ग्रामपंचायत मधून दाखले मिळत नाही त्यामुळे सेवा पंधरवड्यात आपले काम कसे करावे यासंबंधी मुद्दा उपस्थित केला. ओबीसींना घरकुल मिळत नसल्याने वंचित असलेल्या ओबीसींनी तात्काळ घरकुल मिळावे असे सांगितले . इटखेडा ते डोंगरगाव रस्त्याची अवदशा ,गावातील नाली, रस्ते व इतर बांधकामावर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष असल्याने ती कामे होत नसल्याचे सुद्धा गावकरी म्हणाले. या प्रसंगी ग्रामपंचायतच्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार सुद्धा विकास कामात बाधक ठरल्याचे सांगितले. शिक्षण, बचत गट ,आरोग्य व्यवस्था तसेच जि प सदस्य पौर्णिमा ढेगे यांनी इटखेडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र हवे असे सांगून आमदाराचे लक्ष वेधले लक्ष वेधले. आमदार चंद्रिकापुरे यावेळी म्हणाले की ग्रामपंचायतनी याबाबत आपल्याला अद्यापही कोणत्याच समस्या अवगत केले नाही . विकास कामे आणली तर त्याला सरपंच, ग्रामपंचायत सहकार्य करत नसल्याने लाखाच्या सिमेंट रस्त्यापासून गावाला वंचित राहावे लागले,समस्या भरपूर आहेत यांचे निराकरण करण्याकरिता संबंधित खात्याचे अधिकाऱ्यासोबत लवकरच ग्रामपंचायत मध्ये सभा घेऊन समस्या मार्गी लावा लावणार असल्याचे आश्वासन याप्रसंगी आमदारांनी दिले.

सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक अनुपस्थित

गावात आमदारांच्या विकास कामाचे भूमिपूजन होत असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक सुद्धा याप्रसंगी अनुपस्थित होते. ग्रामपंचायतचे फक्त दोन सदस्य यावेळी हजर होते यावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असता ग्रामसेवकावर कारवाईसाठी मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गोंदियाकडे कारवाई करणार असल्याचे आमदारांनी सांगितले. पदाधिकाऱ्यांनी विकास कामात सहभाग नोंदवावा, प्रश्नांच्या पाठपुरावा केल्यास जनतेचे कामे निश्चितच होतील. यासाठी ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधी पुढाकार न घेतल्यास ग्रामविकासाला बाधक ठरतो .जनतेचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याने जनतेचा विकास खुंटतो असल्याचे आमदार म्हणाले.