आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे भारत-रत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जंयती निमित्त वाचनप्रेरणा दिन उत्साहात

0
24

गोरेगाव: १५ ऑक्टोबर- तालुकातील मोहाडी येतील तालुका अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे आज दिनांक १५ ऑक्टोबंर ला माजी राष्ट्रपति भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जंयती निमित्त वाचनप्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जी ई एस हायस्कुल व कनिष्ट महाविद्यालय मोहाडी चे प्राचार्य डि आर चौरागडे हे होते तर प्रमुख अतिथि संस्थेचे सदस्य जे जे पटले, संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय डि चौरागडे, सदस्य हिरालाल महाजन,देविदास चेचाने,माजी सरंपच धुर्वराज पटले, सुभाष चौरागडे, परमानंद तिरेले,आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय डी चौरागडे यांनी भारतरत्नडॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती ही वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरी केली जाते ग्रंथ वाचनाचे मानवी जीवनात फार मोठे महत्त्व आहे मानवांच्या सर्वांगिण विकासात ग्रंथाचे असलेले महत्त्व याविषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डि आर चौरागडे यांनी यांनी सांगितले की ग्रंथ वाचनाने मानवी बुध्दी ला चालना मिळुण सूजनात्मक विचार कूर्ती येतात ग्रंथ वाचनाने विचार सुचतात, ग्रंथामुळे मानसिक, शारिरीक,भोतिक प्रगती करूण आर्थिक संपन्न होता येते असे सांगितले
कार्यक्रमाचे संचालन व आभार नरेंद्र कुमार चौरागडे यांनी केले दुर्गेश चेचाने,प्रवीन येरखडे,आशा चेचाने आदी ने सहकार्य केले यावेळी वाचक मोठ्या संख्येत उपस्थित होते