माणसाला माणुसकीचा जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे बौद्ध धर्म – आ.विनोद अग्रवाल

0
29

गोंदिया–नुकतेच धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त गाँवोगावी बौद्ध धम्माचा धम्म घरोघरी जावो व या धम्मामुळे सामाजिक क्रांती व्हावी व बौद्ध धम्माचे विचार जीवनामध्ये कश्या प्रकारे पसरवता येतील या साठी धम्मचक्र परिवर्तन या दिनानिमित्त विविध बौद्ध धम्माचे गीतांचे व प्रबोधनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतात. बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे व धम्मचक्र परिवर्तनमुळेमोठी क्रांती झालेली आहे आपण या धम्मच्या संकल्पानेजीवन जगण्याची कला हस्तगत करू शकतो. बाबासाहेबांनी स्वत:च्या जीवनाची व आपल्या कुटुंबाची परवाह न करता जनहितासाठी बौद्ध धर्म ची दिक्षा घेतली असे आ.विनोद अग्रवाल यांनी बौद्ध धम्माची महत्वता ची गाथा सांगितली. व कार्यक्रमानिमित्त नागरिकांशी गावातील समस्याबाबत विचारणा केली व अनेक विकासकामे ची शुरुवात असून लवकरच नागरिकांच्या हितासाठी निधी उपलब्ध करून देण्याची माझी जवाबदारी आहे असेही ते बोलले.तसेच धम्मचक्र परिवर्तनादिनाची शुभेच्छा व दिवाळी या सणाची सुद्धा आ.विनोद अग्रवाल यांनी शुभेच्छा दिली.

या कार्यक्रमानिमित्त आ.विनोद अग्रवाल, भाउराव उके अध्यक्ष, जनता की पार्टी, नंदाताई वाढीवा जिप.सदस्य, टीटूलाल लिल्हारे, रामराज खरे, शशिकलाबाई राजू कटरे पस सदस्य, मंजू चित्रसेन डोंगरे, पस.सदस्य लुकेश रहांगडाले, प्रदीप न्यायकरे, एन एल मेश्राम सर, सरोज बोरकर, रोशन लिल्हारे, कृषि सहाय्यक, प्रकाश तांडेकर, सरपंच गिरोला, मायाताई कोल्हे सरपंच दासगाँव खुर्द, दिनेश तुरकर, सचिन बडगुजर, सूर्यभान चौहाण उपसरपंच, दासगाँव खुर्द , विश्वनाथ रहांगडाले, श्यामभाऊ रहांगडाले, गोविंदभाऊ येड़े, तसेच बौद्ध उपासक, उपासिका, व ग्राम पंचायत सदस्य, व इतर गावकरी या दरम्यान उपस्थित होते.