Home विदर्भ 14,272 शेतकर्‍यांच्या खात्यात 44.86 कोटींची प्रोत्साहन राशी जमा

14,272 शेतकर्‍यांच्या खात्यात 44.86 कोटींची प्रोत्साहन राशी जमा

0

गोंदिया,-नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांच्या (Farmers) बँक खात्यात प्रोत्साहन रक्क्म जमा करण्याचा मुहूर्त यंत्रणेला सापडलेला आहे.जिल्ह्यातील सुमारे 29 हजार पात्र लाभार्थ्यांपैकी पहिल्या टप्प्यातील 14,272 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सुमारे 44 कोटी 86 लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आल्याची माहिती आहे.

शेती कसायची म्हटलं की भांडवल हवाच, हे भांडवल अर्थात पीक कर्ज शासन विविध बँकांच्या मार्फत शेतकर्‍यांना  उपलब्ध करून देते.बँकांमार्फत शेतकर्‍यांना अल्प, मध्यम व दीर्घ कालावधीचे पीक कर्ज दिले जाते.अल्पमुदतीच्या पीक कर्जावर 1 लाखाच्या मर्यादेत 31 मार्चपर्यंत रक्कम भरल्यास व्याज आकारले जात नाही. 3 लाख रुपयांचा पीक कर्जावर 6 टक्के व्याज दराने पीककर्ज दिले जाते.यातही वेळेत पीक कर्जाची परतफेड केल्यास शासनातर्फे 2 टक्क्याची सूट दिली जाते.याच बळावर शेतकरी शेती करतात. मात्र कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाची वेळेत परतफेड करू शकत नाही.परिणामी त्यांच्यावर कर्जाचे डोंगर वाढत जाते.अशा परिस्थितीत कर्जमुक्तीची मागणी सर्वच स्तरावरून होते.प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांनाही असा लाभ मिळावा अशी मागणी समोर आली आणि तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुर्जक्ती योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन राशी देण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र घोषणेनंतर ही योजना अनेक कारणांनी गाजली व वादातही सापडली.
जुलै महिन्यात राज्यसत्ता पालट झाले.शिवसेना (शिंदे गट) व भाजपाची सत्ता स्थापन झाली. सरकारने या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. गोंदिया जिल्ह्यात 2 लाख 72 हजार शेतकर्‍यांपैकी केवळ 90 हजार शेतकरी पिक कर्जाची उचल करतात. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 27 हजार पेक्षा अधिक शेतकर्‍यांचे पीककर्ज माफ झाले.नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या याही पेक्षा अधिक आहे.
जिल्हा बँकेकडून प्राप्त माहितीनुसार 29 हजार पेक्षा अधिक लाभार्थी प्रोत्साहन राशीसाठी पात्र ठरले आहेत. पैकी पहिल्या टप्प्यात 14,272 लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सुमारे 44 कोटी 86 लाख रुपयांच्या निधी वर्ग झाला आहे. उर्वरित लाभार्थ्यांना दोन टप्प्यात निधी दिला जाणार आहे.
पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहन निधीचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत आतापर्यंतर्यं 290 पात्र लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.मृतकांच्या वारसांना आता प्रोत्साहन राशीचा लाभ मिळणार आहे. यासाठी त्यांना शासनाच्या दिशानिर्देशानुसार आवश्यक दस्ताऐवज व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

Exit mobile version