Home विदर्भ कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे  गटशिक्षणाधिकारी मोटघरे यांना निवेदन

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे  गटशिक्षणाधिकारी मोटघरे यांना निवेदन

0
**मागासवर्गीय शिक्षकांच्या समस्या निकाली काढणार
गोंदिया-मागासवर्गीय शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी दि. 2 नोव्हेंबर 2022 ला कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात महेंद्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देवरी यांना नियोजित बैठकीत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन गशिअ मोटघरे यांनी दिले.
      जि.प. प्राथ/माध्य/उच्च माध्य शिक्षकांचे चटोपाध्याय वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव जि.प. ला पाठविणे संदर्भाने कार्यवाही करणे, आशिष रंगारी, मुकेश भैसारे, यज्ञराज रामटेके, मुकेश गणवीर, रोशन कऱ्हाडे, अतुल गणवीर, प्रशांत बडोले यांना चटोपाध्याय वेतन श्रेणी लावण्या संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी, दरवर्षी गोपनीय अहवालाची एक प्रत शिक्षकांना देण्यात यावी, शालेय पोषण आहार बिल नियमित काढणे, शिक्षकांचे हिंदी /मराठी सुट प्रकरणे निकाली काढणे, शिक्षकांचे वैद्यकीय बिल तातडीने काढण्यात यावे, भारताचे  संविधान, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फोटो गटशिक्षणाधिकारी/ केंद्रप्रमुख/मुख्याध्यापक यांच्या कार्यालयात लावण्यात यावी, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती संदर्भाने वेळोवेळी मुख्याध्यापकांना सूचना देण्यात यावी, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शिक्षकांचे सेवानिवृत्त प्रकरण फाईल्स सहा महिन्यापूर्वी जि.प. ला.पाठविणे, शिक्षकांचे दुय्यम सेवापुस्तके अद्यावत करण्यात यावे, 0 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्यात येऊ नये, अशा विविध प्रश्न व समस्यांचा समावेश होता .
    यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, रोशन गजभिये, दिक्षांत धारगावे, अजय शहारे, यज्ञराज रामटेके, मुकेश गणवीर, महेंद्र टेंभूर्णे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version