ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा

0
27

तहसीलदारांचे विविध विभागांना निर्देश

जिल्ह्यात 348 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक

18 डिसेंबर रोजी मतदान

  गोंदिया दि. 14: माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी  करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी  तथा तहसीलदार यांनी निर्गमित केले आहेत.

          गोंदिया जिल्ह्यात आमगाव 34, अर्जुनी मोरगाव 40, देवरी 25, गोंदिया 71, गोरेगाव 30, सडक अर्जुनी 43, सलेकसा 31 व तिरोडा 74 अशा एकूण 348 ग्रामपंचायतसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी निवडणूक होणार आहे. ग्रामपंचायतीतील रिक्त पदाची सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 09 नोव्हेंबर 2022 रोजी घोषित केले आहे.  निवडणूक घोषित झाल्यापासून तात्काळ प्रभावाने निवडणूक असलेल्या ग्रामपंवायतीचे क्षेत्रात निवडणूकिचा निकाल जाहिर होईपर्यत आदर्श आंचार संहिता लागू करण्यात आलेली आहे.

निवडणूक कार्यक्रम:- 18 नोव्हेंबर 2022 निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे. 28 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2022 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची  तारीख. 05 डिसेंबर अर्ज छाननी तारीख. 07 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ. 07 डिसेंबर दुपारी 03 नंतर चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध. 18 डिसेंबर रविवारी  सकाळी 07.30 ते सायंकाळी 05.30 मतदान (नक्षलग्रस्त भागात 07.30 ते दुपारी 03 वाजेपर्यंत). 20 डिसेंबर 2022 रोजी  मतमोजणी.

आदर्श आचारसंहिता :- आचारसंहितेमधील तरतुदीचे योग्यरित्या पालन होण्याकरीता निवडणूका असलेल्या सबंधित ग्रमापंचायतीच्या सचिवांनी आपले स्तरावरून संबंधीतांना निर्देश दयावे व तसा अहवाल संबधित तहसीलदारांना सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या निवडणूकी करीता आचारसंहिता जरी सबंधित ग्रामपंचायतचे क्षेत्रात असली तरी निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीतील मतदारांवर प्रभाव पडेल अशा तऱ्हेचे कोणतेही धोरणात्मक निर्णय घ्यावयाचे झाल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास कळविण्यात यावे व त्यांची परवानगी घेण्यात यावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सध्या सुरू असलेली कामे न थांबविता पूर्ण करावेत. आचारसंहिता संदर्भात कोणतीही शंका असल्यास जिल्हाधिकारी यांच्या अभिप्रायासह पत्र पाठवून राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन प्राप्त करून घ्यावे.

          निवडणूक असलेला ग्रामपंचायत क्षेत्रातील दुष्काळ निवारार्थ तसेच पूर परिस्थित व साथीचे रोग यांच्यावर उपाययोजना करणे इत्यादी संदर्भात कोणत्याही कामकाजास आचारसंहितेची बाधा असणार नाही. मात्र यासंदर्भात होणाऱ्या कार्यक्रमास मंत्री, खासदार, आमदार व इतर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी यांचा सहभाग राहणार नाही. आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचा उदघाटनाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार नाही याची काळजी घ्यावी.

          ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व शासकीय, निमशासकीय तसेच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले पक्षाचे बॅनर, पोष्टर्स तसेच जाहिरात दर्शक फलक असल्यास काढणेबाबत आपले स्तरावरून सबंधिताना सुचना देण्याची कार्यवाही तात्काळ करावी. तसेच त्यांचे कडून तशी कार्यवाही करण्यात न आल्यास आपले अधिनस्त अधिकारी – कर्मचारी वृंदाकडून ते काढून घेण्याची  अथवा झाकण्याची कार्यवाही करावी. तसेच मालमत्ता विद्रुप करण्याबाबत तात्काळ संबंधिताविरूध्द संबंधित अधिनियमा अंतर्गत गुन्हे दाखल करून अहवाल सादर करावा. तसेच आपले अधिनस्त असलेले शासकीय विश्राम गृह या कार्यालयाचे पुर्वपरवानगी  शिवाय  कोणत्याही  राजकीय व्यक्तीस आरक्षित न करणेची दक्षता घ्यावी, असे तहसीदारांनी विविध विभागांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.