राष्ट्रीय लोक अदालत मध्ये 5214 प्रकरण निकाली

0
20

पक्षकार व नागरिकांना दिलासा

गोंदिया, दि. 14 : राष्ट्रीय लोक अदालत मध्ये एकूण ठेवलेल्या प्रकरणांपैकी 5 हजार 214 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यावेळी एकूण रुपये 3 कोटी 79 लाख 19 हजार 328 (तीन कोटी एकोनअंशी लाख एकोणविस हजार तीनशे अठ्ठावीस रुपये) एवढी वसुली करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील  न्यायालयात ठेवलेल्या प्रकरणांपैकी 1 हजार 440 प्रकरणे निकाली काढण्यात आली व रुपये 2 कोटी 80 लाख 03 हजार 458  वसुली करण्यात आली. तसेच लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेले पूर्व न्याय प्रविष्ठ 11 हजार 856 प्रकरणांपैकी 3 हजार 774 प्रकरणे निकाली काढण्यात आली व यामध्ये रुपये 99 लाख 15 हजार 870 ची वसुली झाली.

वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले समोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली काढण्याकरिता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया ए. टी. वानखेडे तसेच सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस. व्ही. पिंपळे यांचे मार्गदर्शनाखाली 12 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया येथे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये सर्वच प्रकारच्या तडजोड पात्र न्यायप्रविष्ठ व पूर्व न्याय प्रविष्ठ प्रकरणाकरिता तसेच विद्युत व बँक लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांकरीता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

           लोक अदालतीच्या फलकाचे उद्घाटन  ए. टी. वानखेडे अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया यांच्या शूभहस्ते करण्यात आले. ॲड. बडे, ॲड.  सचिन बोरकर सर्व न्यायाधीश वर्ग यावेळी उपस्थित होते.

           एकूण ठेवलेल्या प्रकरणांपैकी 5 हजार 214 प्रकरणे निकाली काढण्यात आली व एकूण रुपये 3 कोटी 79 लाख 19 हजार 328 (तीन कोटी एकोनअंशी लाख एकोणविस हजार तीनशे अठ्ठावीस रुपये) एवढी वसुली करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील  न्यायालयात ठेवलेल्या प्रकरणांपैकी 1 हजार 440 प्रकरणे निकाली काढण्यात आली व रुपये 2 कोटी 80 लाख 03 हजार 458  वसुली करण्यात आली. तसेच लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेले पूर्व न्याय प्रविष्ठ 11 हजार 856 प्रकरणांपैकी 3 हजार 774 प्रकरणे निकाली काढण्यात आली व यामध्ये रुपये 99 लाख 15 हजार 870 ची वसुली झाली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रासामधून सुटका मिळाली. यामुळे बऱ्याच पक्षकारांनी समाधान व्यक्त केले आहे.

          प्रकरणी तडजोडीने निकाली काढण्याकरिता गोंदिया येथे आदिल खान, जिल्हा न्यायाधीश -1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, गोंदिया, एन. डी. खोसे, तदर्थ न्यायाधीश-1, गोंदिया, आर. एस. कानडे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, गोंदिया, ए. व्हि. कुलकर्णी, मुख्य न्यायदंडाधिकारी, गोंदिया,  व्हि. ए. अवघडे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गोंदिया,  कु. पी. एन. ढाणे, 2 रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गोंदिया, एम. बी. कुडते, 3 रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गोंदिया, वाय. जी. तांबोळी 4 थे सह दिवानी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गोंदिया, एस. डी. वाघमारे, 5 वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गोंदिया यांनी व गोंदिया जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सी. के. बडे, वकील, एस. आर. बोरकर व इतर पदाधिकारी तसेच पॅनल वरील वकील ॲड. एस. एम. विश्वास, ॲड. ई. एस. गणवीर, ॲड. कु. एस. डी. मेश्राम, ॲड. कु. एन. डी. अग्रवाल, ॲड.  एम. ए. नेवारे, ॲड. कु. पी. सी. चौरसिया, ॲड. कु. एम. एस. भोवते गोंदिया यांनी सहकार्य केले.

           सदर लोक अदालतीचे यशस्वी आयोजनाकरिता आर. जी. बोरीकर, प्रबंधक, पी. पी. पांडे, अधीक्षक, एम. पी. पटले सहा. अधीक्षक, जिल्हा न्यायालय गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील आर. जे. ठाकरे. अधीक्षक, सचिन एम. कठाणे, पी. एन. गजभिये, सुशिल डी. गेडाम, तसेच बी. डब्ल्यू. पारधी,  यु. पी. शहारे, बेलीफ, जगदीश पटले,  पी. एल. व्ही गोंदिया तसेच इतर सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.