युवकाचे पाणी टंकीवर चढून ‘शोले स्टाईल’  

0
75
गोंदिया – शेतात जाणारा पांदण रस्ता तयार करून द्या, या मागणीला घेऊन गोेरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील युवक संदीप राजेंद्र सरजारे(वय २६)याने गावातीलच राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पाणी टंकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. गेल्या पाच वर्षापासून शेतकरी संदीप सरजारे यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, रस्ता नसल्याने शेतीची कामे करावी कशी हा प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाकडे धाव घेतली.अनेकदा संबंधित विभागाकडे न्याय मागूनही न्याय न मिळाल्याने आज (दि .  १४) संदीप बारा वाजे दरम्यान गावातीलच पाणी टंकीवर चढला.आणि जो पर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत टाकी खाली उतरणार नाही अशी आंदोलनात्मक भूमिका घेतल्याने एकच खळबळ माजली आहे. यातच आठ तासाचा अल्टिमेटम देत, न्याय न मिळाल्यास पाणी टाकी वरून उडी घेणार असा इशारा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान गोरेगावचे तहसीलदार सचिन गोसावी,पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक घटना स्थळी दाखल झाले आहेत.संदीपला टाकी खाली उतरण्याची विनंती प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. मुंडीपार येथील सहा शेतकऱ्यांच्या विरोधात संदिपच्या वडीलाने जिल्हाधिकारी यांना तक्रार केली आहे. मात्र शेतात जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता न मिळाल्याने आज सोमवारी संदिप न्यायासाठी पाणी टाकीवर चढून न्याय मागत आहे.