राज्यस्तरीय बालरंग “तुमचं पान”चित्रकला स्पर्धेची अभीज्ञा कटरे विजेती

0
19

गोंदिया,दि.15ः जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील बोरकन्हार निवासी साहित्यिक लेखक व सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक ॲड.लखनसिंह कटरे यांची नात अभीज्ञा अनिकेतसिंह कटरे (वय 5 वर्षे) ही मुंबई स्थित “बालरंग” या बाल-त्रैमासिकाद्वारे आयोजित राज्यस्तरीय बालरंग “तुमचं पान” (जुलै २०२२)या चित्रकला स्पर्धेत विजेती ठरली आहे.या स्पर्धेतील विजेत्या बालक/बालिकांमध्ये अभीज्ञा कटरे,अन्वयी वैद्य,सोहम हाके,अथर्व भोसले,भाग्यश्री नाईक व मैत्री चिकणे यांचा समावेश आहे.या सर्वांना आज   मंगळवार १५ नोव्हेंबर २०२२ संध्याकाळी ५.३० वाजता प्रबोधन प्रयोग घर, कुर्ला, (मुंबई) येथे बालरंग दिवाळी-बालदिन-नाताळ विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.