मागासवर्गीय शिक्षकांच्या समस्या निकाली काढणार

0
12

कास्ट्राईब संघटनेला शिक्षणाधिकारी गजभिये यांचे आश्वासन

गोंदिया-मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटना जि. गोंदियाच्या वतीने दि. १५ नोव्हेंबर २०२२ ला ओमप्रकाश वासनिक जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जि.गोंदिया यांच्या नेतृत्वात डॉ. महेंद्र गजभिये शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन गजभिये यांनी दिले. यावेळी श्रीकांत जनबंधू प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
जि.प. प्राथ/ माध्य. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर २०२२ चे वेतन तातडीने करण्यात यावे, जि.प. माध्यमिक शाळेतील ६ ते ८ वी करिता भाषा, गणित, सा.शास्त्र विषय शिक्षकांची पदे तातडीने भरण्यात यावी, भविष्य निर्वाह निधी जमा करणे संदर्भातील शेड्युल वित्त विभागात पाठविण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हफ्ता भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा करण्यात यावा, एन.पी.एस. कर्मचाऱ्यांना रोखीने देण्यात यावा, जि. प. प्राथ. व माध्य. शिक्षकांचे चटोपाध्याय वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करण्या संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी. अशा विविध प्रश्न व समस्यांचा समावेश होता .
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, भरत वाघमारे, सिध्दार्थ भोतमांगे, विरेंद्र भोवते, रोशन गजभिये, सौ. उमा गजभिये, राजेंद्र सांगोळे, उत्क्रांत उके, अनिल मेश्राम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.