जिल्हाधिकारीपदी योगेश कुंभेजकर रूजू

0
57
????????????????????????????????????

भंडारा, दि. 22 : भंडारा जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून योगेश विजय कुंभेजकर (आयएएस) यांनी आज दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.

श्री. कुंभुजकर यांनी आयआयटी, मुंबई मधून बी. टेक ची पदवी प्राप्त केली असून त्यांनी सन 2018 ते 2020 या कालावधीत उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर या पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. दिनांक 13 एप्रिल 2020 रोजी त्यांची जिल्हा परिषद नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी आज 22 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी भंडारा या पदाचा कार्यभार स्वीकारला.