लहरी भक्तांच्या मार्गातील काटे दूर करणार : कृषीमंत्री सत्तार

0
30
लहरीबाबा जन्मशताब्दी महोत्सव : आश्रमाचा चहुमुखी विकास करण्याचे आश्वासन
गोंदिया,-. हम भलेही गुलिस्ता ना बन सके पर उन राहो के काटे जरूर दुर करेंगे, ज्या मागर्ज्ञवरून लहरी बाबांचे भाविक जातिल त्या मार्गावरील काटे आम्ही निश्चितच दूर करणार संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करून लहरीबाबांच्या आश्रमाचा चहूमुखी विकास साधणार, ज्या काही अपेक्षा आहेत. त्या पुढे जाऊन पूर्ण करण्यासाठी कार्य करणार असे आश्वास्मक प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
प.पूं. संत श्री जैरामदास उर्फ लहरीबाबा यांचे जन्मशताब्दी महोत्सवांतर्गत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संत श्री लहरी आश्रम संस्थान, कामठा (मध्यकाशी) येथे 8 डिसेंबर रोजी नवीन ‘लहरी सभागृह’ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी संस्थानमध्ये स्थित शिव मंदिरात पूजा अर्चना केली व संत श्री लहरीबाबा यांच्या समाधीवर प्रार्थना केली. याप्रसंगी त्यांनी, ग्रामपंचायत निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू असल्याने कोणतीही घोषणा करता येत नाही. पण आगामी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आश्रमातील विषयांचे समाधान करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच या आश्रमात येऊन शांतीचा सुखद अनुभव येत असून भविष्यातही लहरी आश्रमात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी श्री लहरी आश्रम संस्थानचे पीठाधीश प.पू. डॉ. खिलेश्वरनाथ खरकाटे उर्फ तुकड्याबाबा, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, केशाराव तागडे, अर्जुन गाडे, सतीश लाडे, माजी आमदार अॅड. संजय धोटे (राजुरा), गोपीचंद लालवानी, सचिव के.बी. बावनथडे, अॅड. अनिल ठाकरे, नंदकिशोर सहारे, संजय तराळ, गोविंद मेश्राम, रामकृष्ण वाघाडे, दीपक कुंदनानी, विजय सातपुडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थानच्या वतीने तुकड्याबाबांनी मंत्री सत्तार यांचे स्वागत करून शाल, श्रीफळ प्रदान केले. प्रारंभी पाहुण्यांनी प.पू. संत लहरीबाबा यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून दिप प्रज्वलन केले. अॅड. धोटे यांनी, बाबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकले. नंदकिशोर सहारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. महाराष्ट्र सरकारविषयी बोलताना मंत्री सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धार्मिक स्थळांप्रति विशेष लक्ष आहे. आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी कार्य करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांची आय वृद्धी करण्याकरिता सरकार नवीन योजनाही सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संचालन संजय दानव यांनी केले तर आभार सचिव बावनथडे यांनी मानले.