तहसीलदार मानसी पाटील यांनी स्विकारला पदभार

0
54

आमगाव,दि.13ः येथील रिक्त असलेल्या तहसीलदार पदाची सुत्रे सोमवार 12 डिसेंबर रोजी नवनियुक्त तहसीलदार मानसी पाटील यांनी स्विकारले. पाटील या मुळच्या जळगावच्या असून त्यांनी सन 2019 मध्ये एमपीएससी
परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला.नुकतीच त्यांची आमगावच्या तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. आमगावच्या पहिल्या महिला तहसीलदार होण्याचा बहुमान पाटील यांनी मिळविला. सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांनी पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रसंगी पाटील यांनी सर्व विभागाची पाहणी केली.यावेळी नायब तहसीलदार सतीश वेलादी, गुणवंत भुजाडे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.