प्रोत्साहन भत्ता लागू केल्याबद्दल जि.प.अध्यक्षांचे महासंघाने मानले आभार

0
89

गोंदिया,दि.14ः गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत येत असलेल्या सर्व कर्मचारी वर्गाला 1500 रुपये प्रोत्साहन भत्ता मंजूर केल्याबद्दल जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानण्यात आले.गोंदिया जिला परिषद कर्मचार्यांना मागील 10 वर्षापासुन प्रलंबित असलेला 15 टक्के प्रोत्साहन भत्ता रू 1500 मर्यादेपर्यंत सर्व कर्मचारी यांना मिळावे,याकरीता सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल पाटिल व जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांनी समोपचाराने चर्चा करुन सदर 15 टक्के प्रोत्साहन भत्ता मंजूर केल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष पी.जी.सहारे,कार्याध्यक्ष सौरभ अग्रवाल,कोषाध्यक्ष सुभाष खत्री,जिला संघटक संतोष तुरकर,लिपिक संघटनेचे अध्यक्ष संतोष तोमर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भागीरथ नेवारे यानी जिला परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.