कृषि प्रदर्शनी करिता शेतकन्यांनी सहभागी होण्याचे आवाहन – डॉ. अर्चना कडू

0
17

भंडारा दि.28 : दिनांक 27 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे राज्यस्तरीय भव्य कृषि प्रदर्शन आयोजीत आहे. या राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनीमध्ये कृषि य विविध संलग्न विभागांची दालने राहणार असून प्रत्येक दिवशी विविध विषयांवर शेती तांत्रीक चर्चासत्रांचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषि क्षेत्रातील आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. शेतकरी व कृषितज्ञ तसेच शास्त्रज्ञ यांच्यात संवाद निर्माण व्हावा, विविध योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने नियोजन करण्यात आलेले आहे. उपरोक्त राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनास भेट देणान्या शेतकन्यांसाठी प्रेरणादायी व मनोबल उंचाविण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. तरी जिल्हयातील सर्व शेतकरी बंधु-भगीनी, कृषि उद्योजक, कृषि प्रक्रिया उद्योग ईच्छुक व प्रक्रिया उग धारक यांनी मोठया संख्येत भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. अर्चना कडू, यांनी केले आहे.