बाबासाहेबांच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नानाजी शेंडे

0
13

गोंदिया ता.22:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. सामाजिक जयंती उत्सव समिती 2023 च्या अध्यक्ष पदासाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आयु. नानाजी शेंडे यांची निवड झाली आहे.
गणेश नगर इथल्या जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात (ता.22) आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी जयंती उत्सव समितीच्या निवर्तमान अध्यक्ष श्रीमती सविता उके या होत्या.
अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये डॉ मनोज राऊत, गेंदलाल तिरपुडे, एन. एल. मेश्राम. सौ. समता गणवीर,अशोक कांबळे यांची नावे सभागृहाणे सुचविले. परंतु सर्वांनी आयु. शेंडे सरांच्या नावाला आपला दुजोरा दिल्याने अध्यक्ष पदाची माळ आयु शेंडे सरांच्या गळ्यात पडली. त्यांचे अभिनंदन करण्यात आले. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. फटाक्याच्या लड्या फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
या सभेत तीन विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येवून मावळत्या अध्यक्ष श्रीमती उके आणि कोषाध्यक्ष कु. वैशाली खोब्रागडे यांनी सुमारे साडे नऊ लक्ष रुपयाचा जमाखर्च सादर केला, तो सभेने एकमताने मंजूर केला.यावेळी श्रीमती उके,श्री नरेश मेश्राम (मुर्री ), सौ समता गणवीर, सुनील भरणे, अभियंता छोटू बोरकर, एन. एल. मेश्राम, डॉ मनोज राऊत यांनीही आपले विचार व्यक्त केले.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सवित्री आई फुले यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संचालन करून ऍड एकता गणवीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या येसस्वीतेसाठी समितीच्या संपूर्ण भीमसैनिकांनी सहकार्य केले.