Home विदर्भ नमाद महाविद्यालयातील कपिल चिखलोंढे दिल्लीतील गणतंत्र दिन परेडमध्ये सहभागी होणार

नमाद महाविद्यालयातील कपिल चिखलोंढे दिल्लीतील गणतंत्र दिन परेडमध्ये सहभागी होणार

0

गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा (एनसीसी) विध्यार्थी कपिल चिखलोंढे याची २६ जानेवारी २०२३ रोजी होणार्‍या दिल्ली येथील राजपतावरील गणतंत्र दिनाच्या परेड साठी निवड करण्यात आली आहे. गोंदिया नजिकच्या जब्बारटोला येथील रहिवासी कपिल
मन्साराम चिखलोंढे हा नमाद महाविद्यालयात बी.ए अंतिम वर्षात शिकत आहे. तो बी.ए प्रथम सत्रापासून राष्ट्रीय छात्र सेनेचा नियमित विध्यार्थी आहे. गणतंत्र दिनाच्या राजपथावरील संचलनात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड चाचणी नागपूर आणि नंतर कोल्हापूर येथे झाली.
दोन्ही निवड चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर कपिल चिखलोंढे याची दिल्लीच्या राजपथावरील गणतंत्र दिनाच्या परेड संचलनासाठी निवड झाली. कपिल चिखलोंढे यांच्यापुर्वी नमाद महाविद्यालयातील भूषण सराटकर,आकाश भालाधरे,नेहा गराडे,विकास शिवणकर आदी विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या राजपथावरील गणतंत्र दिनाच्या परेडमध्ये सहभाग नोंदवून
महाविद्यालयाचे नाव गौरवान्वीत केले आहे. कपिल चिखलोंढेच्या निवडीबद्दल गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक खासदार प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन,संचालक निखिल जैन,प्राचार्या डॉ.शारदा महाजन,४ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्र सेना नागपूरपूचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विशाल मिश्रा, एनसीसीचे ऑफिसर कॅप्टन डॉ.एच.पी.पारधी,महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version