Home विदर्भ राष्ट्रमाता जिजाऊंंचा आदर्श घेऊन आकाशाला गवसणी घाला-मंजूताई चंद्रिकापुरे

राष्ट्रमाता जिजाऊंंचा आदर्श घेऊन आकाशाला गवसणी घाला-मंजूताई चंद्रिकापुरे

0

अर्जुनी मोरगाव,दि.24ः महाराष्ट्र ही संत, महात्मे, राष्ट्रपुरुष यांची परंपरा, वारसा लाभलेली भूमी आहे .भगिनींनो राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्री फुले, माता रमाई यांचे आदर्श घेऊन उंच भरारी घ्या. आकाशाला गवसणी घाला. कर्तृत्वापुढे आकाश ठेवणे करा . शिक्षण घेऊन क्रांती करा. आता मागे वळून पाहायचे नाही .आता लढायचं. गावातून ग्रामीण भागातून क्षितिजा पलीकडचे शिक्षण घेऊन क्रांती करा. देश नव्हे तर जग आपला सन्मान करेल असे प्रतिपादन मंजुताई मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी हळदी कुंकू कार्यक्रमात इटखेडा येथे केले .
ग्रामपंचायत ईटखेडा येथे संक्रातीच्या पर्वावर हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन मंजुताई चंद्रिकापुरे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मंजुताई चंद्रिकापुरे, प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशाताई मस्के, ईटखेडाच्या नवनिर्वाचित सरपंच आशाताई झिलपे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा पद्मजा मेहंदळे, ग्रामपंचायत सदस्या छाया धांडे, वर्षा कावळे, उज्वला गोंडाणे, सीमा कोटरंगे, छाया लोणारे, कल्पना लोणारे ह्या होत्या.
निशाताई मस्के यांनी महिलांना 50 टक्के राजकारणात शरदचंद्र पवार साहेबांनी संधी उपलब्ध करून दिली. ग्रामविकांसाठी त्यांचा नक्कीच फायदा करून घ्यावा असे सांगितले. पद्मजा मेहंदळे म्हणाल्यात की आपण जिजाऊ ,सावित्री ,रमाईच्या लेकी आहोत. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही .स्पर्धात्मक शिक्षण घेऊन क्रांती करावी.आता प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे येत आहेत. आपल्या भावी पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवावे. सरपंच आशाताई झिलपे यांनी महिलांसाठी विविध उपक्रम ग्रामपंचायत मध्ये राबविणार असल्याचे यावेळी सांगितले.
गीतगायन, उखाणे व इतर उपक्रमांनी कार्यक्रमाची रंगत वाढली. हळदीकुंकू व भेटवस्तू भगिनींना यावेळी देण्यात आल्या .यावेळी ईटखेडा, ईसापुर व परिसरातील सुवासिनी व विधवा महिलांनी सुद्धा मोठ्या संख्येत सहभाग दर्शविला होता .कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजना राजगडे, संचालन वैष्णवी धांडे व उपस्थितांचे आभार ममता मैंद यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता लोपा कामळी, इंदू अनवले, श्रीकांत ठाकरे, हेमंत मिसाळ व इतरांनी सहकार्य केले.

Exit mobile version