Home विदर्भ आरएसएसची काळी टोपी घालून गोंदियात जि.प.अध्यक्षांनी केले ध्वजारोहण

आरएसएसची काळी टोपी घालून गोंदियात जि.प.अध्यक्षांनी केले ध्वजारोहण

0

गोंदिया,दि.26ः भारतीय लोकशाहीची (Democracy) मुल्य कायम टिकून रहावी, यासाठी आज 26 जानेवारीला भारताने आपला 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023)उत्साहात साजरा केला.गोंदिया जिल्ह्यातही उत्साहात प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला.मात्र गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय ईमारतीमध्ये ध्वजारोहण करतांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी काळी टोपी(आरएसएसची टोपी)घालून ध्वजारोहण केल्याने  राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सयुंक्त सरकार असून आजच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष वगळता एकही पदाधिकारी उपस्थित नव्हते.विशेष म्हणजे पांंढरा ड्रेस व टोपी हा ड्रेसकोड असून काळी टोपी घालणे म्हणजे निषेध पाळण्यासारखे झालेे आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांच्यावर मात्र राष्ट्रीय स्वंयसेवकसंघाच्या विचारांचा मोठा प्रभाव असल्यानेच त्यांनी सत्तेतील सहकारी मित्रपक्षांच्या भावनांचाच नव्हे तर ड्रेसकोडलाही बाजूला ठेवून काळीटोपी घालत ध्वजारोहण करण्याची केलेल्या हिमतीवर चर्चांना सुरवात झाली आहे.

ध्वजारोहणानंतर संविधान उद्दिशेकेचे वाचन करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती जाखलेकर,उपमुख्यकार्याकरी अधिकारी राजेश भांडारकर,महिला व बालकल्याण उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय गणवीर,जिल्हा पशुसवर्धन अधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी,कार्यकारी अभियंता,मुख्य लेखा वित्त अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा परिषद अध्यक्ष रहागंडाले यांनी काळी टोपी घालून आज विविध ठिकाणी ध्वजारोहण करीत कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने त्यांना काय दर्शवायचे असे चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही तज्ञांच्या मते काळी टोपी घालून ध्वजारोहण करणे चुकीचे आहे,मात्र त्यांनी आरएसएसच्या तत्वांचे पालन करण्याचे ठरविले असावे असेही बोलू लागले आहेत.

गोरेगाव तालुक्यातील सोनी प्राथमिक आरोग्य केंद्रातही जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांनी काळी टोपी घालून ध्वजारोहण केले.त्यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे हे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
गोरेगाव येथील शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात सुध्दा जिल्हा परिषद अध्यक्ष पकंज रहागंडाले यांनी काळी टोपी घालूनच ध्वजारोहण करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे व इतर मान्यवर उपस्थित होते.

२६ जानेवारीलाच संविधान का लागू केले गेले?

२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. २६ जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे १९३० मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती.सन १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्वसंमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला डोमिनियन दर्जा द्यावा. या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

ज्या संविधानाच्या अनुषंगाने आज देशात काम चालू आहे तो मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ.भारतरत्न बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांनी तयार केला. अनेक सुधारणा आणि बदलांनंतर, समितीच्या ३०८ सदस्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर सह्या केल्या. त्यानंतर दोन दिवसांनी २६ जानेवारी रोजी तो देशात लागू करण्यात आला.

२६ जानेवारीचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी त्याच दिवशी भारताला लोकशाही ओळख देण्यात आली. संविधानाच्या अंमलबजावणीनंतर, आधीपासून अस्तित्वात असलेला ब्रिटीश कायदा भारत सरकार कायदा (१९३५) भारतीय राज्यघटनेद्वारे भारतीय शासन दस्तऐवज म्हणून बदलण्यात आला. म्हणूनच दरवर्षी आपण भारतीय २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

 

Berar Times
Exit mobile version