चांडक बंधुचे लग्नसोहळ्याआधी ध्वजारोहण….नंतर मंगलाष्ठके

0
6

गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या तालुकामुख्यालय असलेल्या नगरातील चांडक कुटुंबातील राम आणि श्याम या दोन भावंडांनी लग्न मंडपात जाण्याआधी आज गोंदियात ध्वजारोहण केले. आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या दोन्ही भावंडांनी ध्वजारोहण करत देशाच्या संविधानाला बळकट करण्याचा सामाजिक संदेश दिला आहे. आज  देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. राम आणि श्याम या दोन भावंड लग्न मडंपात जाण्यापूर्वी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केले. तर, चांडक कुटुंबातील वऱ्हाड्यांनी यावेळी राष्ट्रगीत म्हणत तिरंग्याला मानवंदना देत सामाजाला एक नवी दिशा देण्याचं काम केले आहे.

राम आणि श्याम चांडक हे दोघेही उद्योगपती आहेत. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील राहणारे आहेत. दोघेही दोघे उच्चविद्याविभूषित आहेत. या दोघांचा विवाह आज सकाळी गोंदिया येथे पार पडला.लग्नाची तारीख 25, 26 जानेवारी ठरली तर घोडीवर बसण्यापूर्वी आपल्याला ध्वजारोहण करायचे अशी संकल्पना माझ्या काकांची होती. हे आपल्या देशाच्या प्रती कार्य आहे आणि ते करायचे आहे. मला असे वाटते की लग्नापूर्वी ध्वजारोहण करण्याची ही देशातील पहिलीच घटना असेल, असे वर राम चांडक यांनी म्हटले आहे.