गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव चार तालुक्यात राबविली जाणार हत्तीरोग औषधोपचार मोहीम

0
15

दि. 10 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान राबवली जाणार मोहीम

गोंदिया-जिल्ह्यातुन हत्तीरोग रोगाबाबतची विकृती कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सामुदायिक औषधोपचार मोहीम गोंदिया ,तिरोडा ,गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या तालुक्यात राबवली जाणार असून लोकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर गोळ्याचे सेवन करावे कारण गोळ्यां खाल्यामुळेच हत्तीरोगाचे प्रतिबंध होऊ शकते असे आवाहन याप्रसंगी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.
चारही तालुक्यातून हत्तीपायरोग हद्दपार करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याकडून देण्यात येणाऱ्या गोळ्यांचे सेवन त्यांच्या समक्ष करण्याचे आव्हान अनिल पाटील यांनी केले आहे. मोहिमेची जनजागृती व्यापक प्रमाणात होण्यासाठी दवंडी व मायकिंगच्या माध्यमातून करणे, ग्राम सभेमध्ये मोहिमेचे महत्व, प्रभात फेरी इत्यादी माध्यमांचा वापर करण्याचे सूचित त्यांनी ह्या प्रसंगी केले.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात 12 कोटी लोकांना हत्तीपाय रोगाची लागण झालेली आहे. त्यापैकी 40% हत्तीपाय रोगाचे रुग्ण भारतात आहे .भारतात हा रोग देशभर पसरलेला असून केरळ, आंध्र प्रदेश, ओरिसा ,पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश ,मध्य प्रदेश व बिहार राज्यातील काही भागात हत्तीपाय रोगाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात तर महाराष्ट्रात नागपूर, नांदेड, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली इत्यादी जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतात. गोंदिया जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या 0.2% रुग्ण आहेत.जिल्ह्यात अंडवृद्धी व हत्तीपाय रोगाचे रुग्ण सर्वत्र आढळतात. गोंदिया तालुक्यात १९६, तिरोडा 242,आमगाव 77,गोरेगाव 182, देवरी 76,सडक अर्जुनी 198 , सालेकसा 27,अर्जुनी मोरगाव 399, गोंदिया शहरी 51,तिरोडा शहरी 33 असे एकूण 1481 रुग्ण असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी दिली आहे. ह्या वर्षी टास निकषाद्वारे गोंदिया, तिरोडा ,गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या चारही तालुक्यात दि.10 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग औषधोपचार मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी सदर मोहिमेचे सादरीकरण केले. या मोहिमे दरम्यान घरोघरी, शाळेत ,कार्यालयात, बुथ निहाय माध्यमातून डीईसी व अल्बेडेंझॉल गोळ्या वाटप करण्यात येणार असून आठ लाख 96 हजार 157 लोकांना गोळ्या वाटप करण्याचे उद्दिष्ट असून 589 टिम यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घातल्या जाणार आहेत.गोळ्या वाटपासाठी 1178 कर्मचारी व 116 पर्यवेक्षक मोहिमेत काम करणार आहे.
या मोहिमेदरम्यान दोन प्रकारच्या गोळ्या देणार आहेत डीईसी गोळी वयोमानानुसार व अल्बेडेंझॉल ही गोळी प्रत्येकी एक याप्रमाणे द्यायची आहे. या गोळ्यांचे सेवन दोन वर्षा खालील बालकांनी ,गरोदर मातांनी आणि गती गंभीर आजारी व्यक्तींनी सेवन करू नये. या गोळ्या उपाशी पोटी घेऊ नये असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी सांगितले आहे.