Home विदर्भ ‘कामधेनू दत्तक’मुळे दुग्ध उत्पादनात वाढ

‘कामधेनू दत्तक’मुळे दुग्ध उत्पादनात वाढ

0

गोंदिया-: दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र शेतकर्‍यांची विदारक स्थिती आहे.पारंपरीक शेतीमुळे दिवसेंदिवस शेती म्हणजे नुकसानीचा सौदा होत चालली आहे.शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेती पूरक व्यवसाय करण्याची गरज आहे.या उद्देशातून 2011-12 पासून आतापर्यंत जिल्ह्यातील 306 गावांनी शासनाच्या कामधेनू ग्राम म्हणून दत्तक योजनेतंर्गत दत्तक घेऊन दुग्ध उत्पादनात 20 टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. यासाठी पशुपालकांला तांत्रिक जोड देऊन लसीकरण ते जनावरे संवर्धनापर्यंतची जबाबदारी सांभाळण्याची किमया पशुसंवर्धन विभागाकडून कामधेनू दत्तक गावात करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत जिपच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे 300 पैदास योग्य पशु असणार्‍या गावांची पशुगणना करुन त्या गावांची कानधेनू दत्तक ग्राम म्हणून निवड करण्यात आली.ज्या गावाला दत्तक घेतले त्या गावातील सर्व जनावरांचे लसीकरण,दुग्ध उत्पादन कसे वाढविता येईल,जनावरांची औषधे, खनिजद्रव्ये, जंतना शक औषधी आदी उपाययोजनांसह शेतकर्‍यांची सहल, संकरित वासरांचा मेळावा,जनावरांच्या विस्तारासाठी कार्यक्रर्य,चारा व खताचे व्यवस्थापन आदी उपक्रम राबविले जातात.ज्या गावाला कामधेनू दत्तक घेतले, त्या गावाला वर्षाकाठी 1
लाख 52 हजार रुपये जनावरांच्या संवर्धनासाठी देण्यात येतात. कामधेनू गावातील शेतकरी व पशुमालकांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी एक दिवस मुक्काम राहतात.जिल्ह्यात 2011-12 पासून ही योजना राबविली जात असून पूर्वीच्या तुलनेत दुध उत्पादन 20 टक्क्याने वाढले असून या गावांनी दुग्ध व्यवसायातून विकास साधला आहे.
कामधेनू दत्तक गावाला वेळोवेळी मार्गदर्शन करुन तेथील दुध उत्पादनावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे जिल्ह्यातील कामधेनू दत्तक गावांत 20 टक्क्याने दुधाचे उत्पादन वाढ आहे.त्या गावांतील पशुंची देखरेख व मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवस दत्तक गावात मुक्काम केला जात असल्याचे जिपचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले यांनी सांगितले.

Exit mobile version