स्व.मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सुवर्णपदक वितरण समारोह ९ फेब्रुवारीला

0
46

गोंदिया – भंडारा -जिल्ह्यातील स्वनामधन्य नेता व शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त ९ फेब्रुवारी २०२३ रोज गुरुवारला सुवर्णपदक वितरण समारंभाचा कार्यक्रम एन. एम. डी. महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या सुवर्णपदक वितरण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. सुवर्णपदक वितरण कार्यक्रमाचे आयोजन गोंदिया शिक्षण संस्था, मनोहरभाई पटेल स्मृती समिती व गुजराती राष्ट्रीय केळवणी मंडळ द्वारा करण्यात येत आहे.  या स्वर्णपदक वितरण सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार व गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव श्री राजेंद्र जैन यांनी केले आहे.