Home विदर्भ झाडीबोली साहित्य समेंनातून नवकवींना प्रेरणा-डाॅ.परिणय फुके

झाडीबोली साहित्य समेंनातून नवकवींना प्रेरणा-डाॅ.परिणय फुके

0

साकोली- साहित्य संमेलने ही बौद्धिक मेजवाणी असतात. यातून पुढे येणार्‍या साहित्यिकांना, नवकवींना प्रेरणा मिळते. डॉ.हरिश्‍चंद्र बोरकरांनी लावलेले हे झाडीबोलीचे इवलेसे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरीत झाले आहे. आपण यापुढच्या झाडीबोली साहित्य संमेलनासाठी निश्‍चितच अनुदान देणार असून बोलीभाषांच्या उत्थानासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथे आयोजित ३0 व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या उद््घाटनपर भाषणात केले.
झाडीबोली साहित्य मंडळ साकोली, शारदा वाचनालय पिंडकेपार तसेच सर्वांगीण शिक्षण संस्था साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथील कवी स्व. दयाराम चांदेवार गुरूजी साहित्य नगरीत सर्वांगीण शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात २८ व २९ जानेवारी रोजी ३0 व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे थाटात उद््घाटन करण्यात आले. यंदाचे संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवयत्री रंजना हलमारे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे उद््घाटन माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून झाडीबोलीचे अध्र्वयरू डॉ. हरिश्‍चंद्र बोरकर, पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. परशुराम खुणे, पूर्व संमेलनाध्यक्ष डॉ.मनोहर नरांजे, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, बोलीसंशोधक हिरामन लांजे, समिक्षक अँड. लखनसिंह कटरे, राजन जायस्वाल, संत डोमाजी कापगते, केंद्रीय सचिव राम महाजन, दिवाकर मोरस्कर, पालिकचंद बिसने, मुरलीधर खोटेले, स्वागताध्यक्ष अमोल हलमारे, गजानन डोंगरवार, सरपंच नंदकिशोर समरीत, डॉ.हितेंद्र चांदेवार, जि.प.सदस्या दिपलता समरीत, माहेश्‍वरी नेवारे, पं.स.सदस्या सरीता लंजे, डॉ. नेपाल रंगारी, माजी सरपंच सुनिता समरीत, अंगराज समरीत, शंकर कापगते, पं.स.सभापती गणेश आदे, प्रकाश बाळबुद्धे, रवी परशुरामकर, नितीन खेडीकर, राधेश्याम मुंगमोडे, हेमराज नेवारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम गावातील हनुमान मंदिरातून पुस्तक पोहा अर्थात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यात विविधरंगी पारंपारिक वेषभूषेत सर्वांगीण शिक्षण विद्यालय पिंडकेपार व जि.प.वरीष्ठ प्राथमिक शाळा पिंडकेपार येथील विद्यार्थी, लोककलावंत, भजनी मंडळे सहभागी झाले होते. यावेळी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा येथील झाडीबोली साहित्यिकांची मांदियाळी जमली होती. राम महाजन यांनी प्रस्तावनेतून झाडीबोली संमेलनांची परंपरा विस्तृतपणे मांडली. उद््घाटनपर सोहळ्यात सर्वांगीण शिक्षण विद्यालय पिंडकेपार येथील विद्यार्थीनींनी झाडीबोली भाषेत स्वागत गीत गायले तर लोकराम शेंडे यांनी झाडी गौरव गीत गावून संमेलनात रंगत आणली. भूमिका डॉ. हरिश्‍चंद्र बोरकर यांनी मांडली तर आदव्याची सुपारी स्वागताध्यक्ष अमोल हलमारे यांनी दिली. दुकोडा पालिकचंद बिसने यांनी सादर केला. पूर्वाध्यक्ष डॉ. मनोहर नरांजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सुत्रसंचालन कार्याध्यक्ष डॉ. संजयकुमार निंबेकर यांनी तर आभारप्रदर्शन कुंजीराम गोंधळे यांनी केले. यशस्वीतेसाठी झाडीबोली चळवळीचे सर्व कार्यकर्ते, स्थानिक झाडीबोली शाखेचे पदाधिकारी व स्वागत समिती सदस्य आदींनी सहकार्य केले. यावेळी केंद्रशासनाचा संगीत नाट्य अकादमीचा अमृत पुरस्कार विजेते ज्येष्ठ झाडीबोली साहित्यिक डॉ. हरिश्‍चंद्र बोरकर व पद्मश्री पुरस्कार विजेते झाडीपट्टी रंगकर्मी डॉ.परशुराम खुणे, ज्येष्ठ समाजसेवक अँड. सीताराम हलमारे, संत डोमा कापगते, डॉ.संजयकुमार निंबेकर, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक मारोतराव तरोणे, नवनिर्वाचित सरपंच नंदकिशोर समरीत तसेच गावातील पेट, नेट,सेट झालेल्या तसेच आचार्य पदवीप्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version