प्रदूषणमुक्ती,निरोगी आरोग्यासाठी डोंगरगड सायकलवारी

0
10

गोंदिया,दि.14ः– दिवसेंदिवस वातावरण बदलत आहे, ग्लोबल वॉर्मिंगचे संकेत मिळत आहे.याला कारण प्रदुषण
आहे,या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी गोंदियातील काही युवकयुवतींनी ‘एक दिन सायकल के नाम’ उपक्रम
सन 2017 साली सुरू केला.दर रविवार सकाळी 15 ते 20 किमी सायकल चालवून प्रदूषणमुक्त व निरोगी आरोग्याचा संदेश देण्यात येत आहे.आता हा संदेश छत्तीसगड,मध्येप्रदेश राज्यातही पोहचावा या उद्देशाने माँ बम्लेश्वरीचे धाम म्हणून प्रसिध्द छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे मातृ पितृ दिवसाचे औचित्त साधत मागील दोन वर्षापासून गोंदिया ते डोंगरगड सायकलवारी सुरू आहे.रविवार 12 फेब्रुवारी रोजी गोंदिया हुन 30 युवक-युवती सायकलने डोंगरगडसाठी रवाना झाले.वारीत 13 ते 80 वर्षापर्यंतचे सायकलिस्ट सहभागी झाले आहेत.सन 2017 पासून या अभियानातील दोन युवक अमन व शांती,निरोगी आरोग्य,प्रदूषणमुक्त भारतचा संदेश घेऊन हजारो किमीची यात्रा करून बाघा बॉडर जम्मू-काश्मीरपर्यंत पोहचले.अभियानाचा महत्व जाणून अभियानाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.अभियानाच्या माध्यमातून इंधन बचत,निरोगी आरोग्य व प्रदूषणापासून दूर होण्यासाठी शेकडो युवकांनी सायकल चालविण्यास सुरवात केली आहे.
रविवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास येथील जयस्तंभ चौकातुन 30 युवक युवतींनी सायकल वारीचा प्रारंभ करीत ते डोंगरगढ येथे पोचले. त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.