न्यायासाठी सूर्याटोलावासीयांचा पोलिस ठाण्यावर हल्लाबोल

0
28

सूर्याटोला येथील जळीत हत्याकांड : आरोपीला अटक
गोंदिया : शहराजवळील सूर्याटोला येथे जावयाने आपल्या सासºयासह पत्नी व मुलाला पेट्रोल घालून जाळल्याची घटना बुधवारच्या रात्री 1 वाजता घडली. याप्रकरणी आरोपीचा रामनगर पोलिसांनी अटक केली. अटक झाल्याचे कळताच सूर्याटोलावासी रात्री 9 वाजताच्या सुमारास रामनगर पोलिस ठाण्यात धडकले. यावेळी आरोपीला फाशीची द्यावी, अशी एकाच मागणी त्यांनी केली. यावेळी ठाणेदार केंजळे यांनी आम्ही आरोपीला फाशीची शिक्षा देवू अशी हमी दिली. त्यामुळे सूर्याटोलावासी शांत झाले.
सूर्याटोला येथे जावयाने आपल्या सासºयासह पत्नी व मुलाला पेट्रोल घालून जाळल्याची घटना बुधवारच्या रात्री 1 वाजेदरम्यान घडली. या घटनेत आरोपीचा सासर देवानंद मेश्राम वय 52 रा.सूर्याटोला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आरोपीची पत्नी आरती किशोर शेंडे वय 35, रा.भिवापूर, ता.तिरोडा व मुलगा जय किशोर शेंडे वय 5 रा. भिवापूर, ता.तिरोडा हे 90 टक्के जळाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले होते. दरम्यान, जय किशोर शेंडे वय 5 याचाही नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामनगर पोलिसांनी आरोपी जावई किशोर श्रीराम शेंडे (वय 40) रा. भिवापूर, ता. तिरोडा याला भिवापूर येथील शेतशिवारातून रामनगर पोलिसांनी अटक केली. अटक झाल्याचे सूर्याटोलावासीयांना कळताच त्यांनी रात्री 9 वाजताच्या सुमारास रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली व आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली. यावेळी ठाणेदार केंजळे यांनी आम्ही आरोपीला फाशीची शिक्षा देवू, अशी हमी दिली. त्यामुळे सूर्याटोलावासी शांत झाले व घरी परतले.