आमदार रहांगडाले यांच्या हस्ते तिरोडा शहरातील विकासकामांचे भूमिपूजन

0
28

तिरोडा:– नगर परिषद तिरोडा क्षेत्रात विविध प्रभागातील रस्ते विकासाकरिता तिरोडा गोरेंव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून २.५० कोटी मंजूर झाले असून सदर कामांचे भूमिपूजन आमदार महोदयांच्या हस्ते संपन्न झाले. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग ३ मध्ये रस्ते व नाली बांधकामाकरिता ४०.०० लक्ष, प्रभाग क्र.४ मध्ये रस्ते व नाली बांधकामाकरिता ३०.०० लक्ष, प्रभाग ५ मध्ये रस्ते व नाली बांधकामाकरिता ९०.०० लक्ष, प्रभाग ६ मध्ये रस्ते व नाली बांधकामाकरिता ६०.०० लक्ष, प्रभाग ७ मध्ये रस्ते व नाली बांधकामाकरिता १००.०० लक्ष, प्रभाग ८ मध्ये रस्ते व नाली बांधकामाकरिता २०.०० लक्ष अशा एकूण २५०.०० लक्ष कामांचा समावेश असून भूमिपूजन प्रसंगी  सोनाली देशपांडे,माजी सभापती चिंतामण रहांगडाले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे, जिल्हा सचिव राजेश मलघाटे, भाजप शहरअध्यक्ष, स्वानंद पारधी, शहर उपाध्यक्ष, मकरम लिल्हारे, युवा मोर्चा शहरअध्यक्ष अमोल तितीरमारे, माजी. न.प.सभापती अशोक असाटी, संजय बैस, भाजयुमो जिल्हा सचिव शीतल तिवडे, किसान आघाडी शहरअध्यक्ष नितीन पारधी, शहर महामंत्री,दिगंबर ढोक, प्रकाश सोनकावडे, भाजयुमो जिल्हा महिला मोर्चा सचिव राणी सोनेवाने, राजकुमार कटरे, ओबीसी आघाडी अध्यक्ष डीलेश पारधी, भाजप तिरोडा शहर सचिव संजय रहांगडाले, भाजप तिरोडा महिला मोर्चा शहरअध्यक्ष सौ. राणी बालकोठे, सौ. सोनाली सोनकावडे, माजी प.स. सदस्य थानसिंग रहांगडाले, कैलाश कटरे, अनुप बोपचे, सागर खनंग, शेखर रहाटे तसेच शहराचे कार्यकर्ते उपस्थित होते.