Home विदर्भ उपमुख्यमंत्र्यांच्या खासगी सहायकाच्या कार्यालयासाठी ९.४० लाखाचे एसी, निविदा वादात

उपमुख्यमंत्र्यांच्या खासगी सहायकाच्या कार्यालयासाठी ९.४० लाखाचे एसी, निविदा वादात

0

नागपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी स्वीय सहायक यांच्या कार्यालय आणि सरकारी निवासात एसी ( वातानुकूलित यंत्र) लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ( विद्युत) ९ लाख ४४ हजार  रुपयांचा निविदा काढल्या आहेत. त्या वादात सापडण्याची शक्यता आहे.उपमुख्यमंत्र्यांचे नागपुरात देवगिरी हे शासकीय निवासस्थान आहे. तेथेच स्वीय सहाय्यकाचे कार्यालय आणि निवासस्थान आहे. तेथे एसी लावण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेनुसार ही नियमित प्रक्रिया आहे. देवगिरी हा उपमुख्यमंत्र्यांचा बंगला असून तेथील सर्व खोल्या व कार्यालये वातानुकूलित असते. जनमंचने या उधळपट्टीचा निषेध केला आहे. बाजारात सामान्यपणे ४० ते ५० हजार रुपयात चांगले वातानुकूलित यंत्र मिळते. मग इतका खर्च कशासाठी. खासगी स्वीय सहाय्यक हे सरकारी पद नाही. त्यामुळे त्याच्यासाठी सरकारी तिजोरीतून लाखो रूपये खर्च करणे चूक आहे, अशी टीका आता या प्रकरणात होऊ लागली आहे.

Exit mobile version