आंगणवाडी कर्मचार्यांनी पुकारला संप,जिल्हा परिषदेसमोर केली निदर्शने

0
42

गोदिया,दि.20ः महाराष्ट्र राज्य आंगनवाड़ी बालवाड़ी कर्मचारी यूनियन आयटक व हिंद मजदूर सभेच्या आव्हाना वर अंगणवाडी बालवाडी कर्मचारी आज 20 फेब्रुवारी 2023 पासुन संपावर गेल्या असून जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने करुन सरकारचे आपल्या मागण्याकंडे लक्ष वेधले. आयटकचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहागंडाले,आम्रकला डोंगरे,जिवनकला वैद्य,ज्योती डोंगरे,प्रणिता रंगारी,सरिता मांडवकर,उर्मिला खोब्रागडे,मंगला शहारे,विना गौतम राजलक्ष्मी हरिनखेडे.,ज्योती लिल्हारे,सुनिता मंलगाम,बिरजूला तिडके,अर्चना मेश्राम,लालेश्वरी शरणागत,अनिता शिवनकर,पंचशिला शहारे,काचंन शहारे,पुष्पा भगत,अजंना ठाकरे,दुर्गा संतापे आदि अगणंवाडी संघटनेतील प्रमुखांनी मोर्च्याला मार्गदर्शन केले. आंदोलनात आंगणवाडी सेविका,सहायिका,मिनि कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्यात यावे.नियमित पेंशन लागू करण्यात यावे.थकीत रक्कम त्वरीत देण्यात यावे.मराठीमध्ये पोषण आहार टॅकर सुरु करुन नवीन मोबाईल देण्यात यावे.आंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा देण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन हे आंदोलन आजपासून बेमुदत सुरु करण्यात आले आहे.