शहारवाणी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोरेगांव- तालुक्यातील शहारवाणी येथे १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शहीद गोवारी स्मारकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहरवणी तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश नेवारे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते भागचंद रहांगडाले, प्रा. डी. सी. कटरे, नीरज दुबे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून गावचे सरपंच सचिन मेश्राम, उपसरपंच तुकाराम गौतम, पोलीस पाटील पटले, विनोद गौतम, राजेश पटले, राजेश बिसेन, जितेंद्र चौरीवार, महेंद्र चौरीवार, दिलीप पटले, शिला डोहले, मुनेश्वरी बिसेन आदी उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित प्रा. डी. सी. कटरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सविस्तर मार्गदर्शन त्यांनी जिंकलेल्या गड किल्ले व अष्टप्रधान मंडळ संदर्भात प्रकाश टाकला. यावेळी भागचंद रहांगडाले, नीरज दुबे, विनोद गौतम, राजेश पटले, राजेश बिसेन, पोलीस पाटील पटले, सरपंच मेश्राम, उपसरपंच गौतम यांच्यासह कार्यक्रम अध्यक्ष सुरेश नेवारे आदींनी सविस्तर मार्गदर्शन केले.