Home विदर्भ मुल्ला येथे शिवजयंती उत्साहात साजरी

मुल्ला येथे शिवजयंती उत्साहात साजरी

0

देवरी, (दि.२०)- येथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुल्ला येथे जानता राजा आणि महाराष्ट्राचे आराध्य  छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवरी पंचायत समितीचे उपसभापती अनिल बिसेन हे होते. यावेळी मंचावर सामाजिक कार्यकर्ते नितेश वालोदे, आमगावचे केंद्रप्रमुख मधुकर राऊत,प्रा. चव्हाण, उपसरपंच सोनू मेंढे, चारभाटाचे माजी सरपंच पुरण मटाले, धनराज हुकरे, मुल्लाचे पोलिस पाटील ललिता भुते, योगेश बोरकर,सामाजिक कार्यकर्ते मुकुंद बागडे, सुरेंद्र मेंढे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त गावातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या जयंती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  स्मारक समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version