बाघोली (मरारटोला) येथे पाणीपुरवठा योजना तसेच रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
20

गोरेगाव : देशातील सरकार मुलभूत सोयी सुविधा नागरिकांना मिळाव्या म्हणून कार्य करीत आहे. प्रत्येकाला आवास,  सिलेंडर, वीज कनेक्शन नंतर प्रत्येक घरात पिण्याचे मुबलक प्रमाणात पाणी पोचावे या उद्देशाने हर घर नल हर घर जल योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना प्रभावी पद्धतीने लागू करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी सांगितले.बाघोली (मरारटोला) येथे पाणीपुरवठा योजना (२७ लक्ष) तसेच रस्ता बांधकामाचे ( १२ लक्ष) भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. सदर योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणार असे रहांगडाले यांनी सांगितले.

दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, उद्घाटक म्हणून  पं.स. सभापती मनोज बोपचे, दिपप्रज्वलक म्हणून जि.प.सदस्य शैलेश नंदेश्वर, उप सभापती राजकुमार यादव, हौसकुमार बिसेन पोलीस पाटील बाघोली, विशेष अतिथी म्हणून नलिनीताई सोनवाने सदस्या पं.स. गोरेगाव, सुप्रिया गणवीर, सदस्या पं.स. गोरेगाव, हेमराज बिसेन अध्यक्ष तंटा मुक्ती समिती बाघोली, योगेश पारधी अध्यक्ष सेवा सहकारी संस्था बाघोली, भैयालाल पारधी अध्यक्ष भाजप बाघोली, राजेश कटरे माजी सरपंच बाघोली, पुष्पाताई ठाकूर माजी सरपंच बाघोली, प्रमुख अतिथी म्हणून, दुर्गाबाई उके, नोकेश चन्ने उपसरपंच बाघोली, डॉ. मिनेश चौधरी ग्रा. पं. सदस्य बाघोली, गोपीचंद पटले ग्रा. पं. सदस्य बाघोली, नलिनीताई खोब्रागडे ग्रा. पं. सदस्य बाघोली, ललिताताई भैरम ग्रा. पं. सदस्य बाघोली, सिंधुताई बिसेन ग्रा. पं. सदस्य बाघोली, ब्रिजलाल आगडे सदस्य से.स. बाघोली, बितीन सदस्य से.स. बाघोली, नरेश बिसेन सदस्य से.स. बाघोली, गुलाबचंद बिसेन उपाध्यक्ष से.स. बाघोली, प्रेमचंद ठाकूर सदस्य से.स. बाघोली, तेजराम रहांगडाले सदस्य से.स. बाघोली, योगराज रहांगडाले सदस्य से.स. बाघोली, गेंदलाल चौधरी सदस्य से.स. बाघोली, ईश्वर कटरे सदस्य से.स. बाघोली, प्रभुलाल नेवारे सदस्य से.स. बाघोली, कीर्तीताई चौधरी सदस्य से.स. बाघोली, अंजनाबाई पारधी सदस्य से.स. बाघोली व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.