Home विदर्भ संत गाडगेबाबा समाजाला जागृत करण्यासाठी झटलेले महान कर्मयोगी- उपमुकाअ भांडारकर

संत गाडगेबाबा समाजाला जागृत करण्यासाठी झटलेले महान कर्मयोगी- उपमुकाअ भांडारकर

0

*जिल्हा परिषद येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन

गोंदिया – संत गाडगेबाबा यांनी आपले संपूर्ण आयुष्य अंधश्रध्दा, अज्ञान आणि अस्वच्छता याबाबतीत समाज जागृत करण्यासाठी घालविले. त्यांनी केलेल्या समाज प्रबोधनामुळे आज आपल्या देशाला विकासात हातभार लागला आहे. समाजासाठी निःस्वार्थ कार्याने झटलेले संत गाडगेबाबा हे एक महान कर्मयोगी होते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारत येथे आज 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11वाजता संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण संजय गणवीर उपस्थित होते. सुरुवातीला दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी पाणी व स्वच्छता विभागाचे भागचंद्र रहांगडाले यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर सविस्तर प्रकाश टाकून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी केले.

Exit mobile version