Home विदर्भ रानगवे करताहेत धान पीक फस्त

रानगवे करताहेत धान पीक फस्त

0

वन विभागाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या उपोशनाचा इशारा
अर्जुनी मोरगाव,दि.२६::: शेतकऱ्यांनी नुकतेच उन्हाळी धानची लागवड केली. धान डूलत असताना अचानक रानगव्याने शेतच फस्त करण्याचा उपक्रम मागील आठ दिवसापासून सुरू ईटखेडा जवळील डोंगरगाव रीठी येथे चालविला आहे. वन विभागाकडे तक्रार करून सुद्धा साधी चौकशी सुद्धा केली नाही त्यामुळे शेतकऱ्यात तीव्र असंतोष पसरला असून वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी मोरगाव समोर उपोषणाचा इशारा दिला आहे.
अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत इटखेडा गावातील शेतकऱ्यांची डोंगरगाव रिठी येथे शेती आहे .उन्हाळी धान पिकाची लागवड होऊन पंधरा दिवस झाले. शेतामध्ये चांगल्या प्रकारे धान डोलत आहेत. शेतकऱ्यांनी स्वतःचे सर्वस्व अर्पण करून धाण पिकाची लागवड केली. अशातच मागील चार दिवसापासून जंगल परिसरलगतच्या धान पिकावर रान गव्याच्या कळपाने शेतपीक फस्त करण्याचा उपक्रम चालवला. संबंधित घटनेची माहिती सरपंच आशाताई झिलपे यांनी वनपरिक्षेत्राधिकारी अर्जुनी मोरगाव यांना दिली. वनपरिक्षेत्राचे कर्मचारी यांनी फक्त रात्री आम्ही ग्रस्त घालतो असे सांगितले .परंतु मोका चौकशी अद्यापही झाली नाही मध्यंतरीच्या दोन दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा रानगव्याणे धुमाकूळ घातला. रात्रीची गस्त असताना गवे पुन्हा आक्रमक झाल्याने यांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून वनाधिकारी आता लक्ष देत नसल्याचे गाऱ्हाणे कुणासमोर मांडायचे हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढें उभा ठाकला आहे. गावात व लगतच्या जंगलात वाघ,अस्वल सारख्या जंगली जनावरांचे नेहमीच वावर असल्याने शेतकरी सुद्धा घाबरल्याने सायंकाळ झाली की घरी परत येतात, रात्री शेतामध्ये गस्त घालायला घाबरत आहेत.
इटखेडा येथील त्रस्त शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांनी रानगव्याचा बंदोबस्त न केल्यास शेवटी पर्याय म्हणून वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे समोर उपोषणाच्या इशारा उद्धव मेहंदडे ,विकास लांडगे ,आनंदराव मेहंदळे ,गोवर्धन मिसाळ, मोरेश्वर मिसाळ , सेवक प्रधान ,हरिदास प्रधान, मोरेश्वर प्रधान, जगन लांडगे, सिद्धार्थ गडपाल, टिकाराम बोरकर, रवी बोलने , मनोहर लांजेवार, मारुती प्रधान, रमेश ठाकरे , रूपराम धांडे व इतरांनी दिला असून यासंबंधीचे निवेदन खासदार प्रफुलभाई पटेल,आमदार मनोहर चंद्रीकापुरे, उपवन संरक्षक गोंदिया यांना पाठविले आहे.

Exit mobile version