Home विदर्भ जिल्हास्तरीय सरपंच परिषद, प्रशिक्षण व संकल्प मेळावा 28 फेब्रुवारी रोजी

जिल्हास्तरीय सरपंच परिषद, प्रशिक्षण व संकल्प मेळावा 28 फेब्रुवारी रोजी

0

उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार गौरव
गोंदिया-जल जीवन मिशन जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग, पंचायत विभाग तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद गोंदिया यांच्या समन्वयाने दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हास्तरीय सरपंच परिषद, प्रशिक्षण व संकल्प मेळाव्याचे आयोजन सकाळी 9वाजता न्यू ग्रीनलण्ड लान, बालाघाट रोड गोंदिया येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल पुंड उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजी. यशवंत गणवीर, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समिती सभापती योपेंद्रसिंह टेंभरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रुपेश कुथे, जि. प. महिला व बालकल्याण सभापती सविता ताई पुराम, जि. प. समाजकल्याण सभापती पूजा अखिलेश सेठ, तिरोडा पंचायत समिती सभापती कांताताई पटले, सडक अर्जुनी पंचायत समिती सभापती संगीता खोब्रागडे, गोंदिया पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, गोरेगाव पंचायत समिती सभापती मनोज बोपचे, अर्जुनी मोरगाव पंचायत समिती सभापती कविता ताई कोडापे, सालेकसा पंचायत समिती सभापती प्रमिला गणवीर, आमगाव पंचायत समिती सभापती राजेंद्र गौतम, देवरी पंचायत समिती सभापती अंबिका बंजार, जि. प. गटनेता लायकराम भेंडारकर, गटनेता संदीप भाटिया, गटनेता सुरेश हर्षे, गटनेता आनंदा वाडीवा यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमात लोक सहभागातून ग्रामविकास याबाबत चंद्रपूरचे चंदू पाटील मारवरकर, मी लोकसेवक याबाबत माजी सरपंच जीवन लंजे तसेच आदर्श गाव याबाबत माजी सरपंच हेमकृष्ण संग्रामे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. कार्यक्रमात सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत उत्कृष्टपणे काम करणाऱ्या तसेच जिल्हा स्तरावर पुरस्कार प्राप्त तसेच आर.आर.पाटील योजनेत तालुका व जिल्हास्तरावर क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्रीमती प्रमिला जाखलेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) गोविंद खामकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नरेश भांडारकर,. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा सुमित बेलपत्रे यांनी केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version