किसान सन्मान निधीचा लाभ घ्या : खा. सुनील मेंढे

0
26

गोंदिया,दि.26ः: महाविकास आघाडी सरकारने शंकरपट आयोजनावर आणलेली बंदी भाजप सरकारने उठविल्यामुळे आज येथे शंकरपटाचे भव्य आयोजन होत आहे. शेतकर्‍यांसाठी ही उर्जा देणारी बाब आहे.शेतकर्‍यांनो,शेतीत नवनवीन प्रयोग करुन उत्पादनात वाढ करा.तसे मोदी सरकारने शेतकर्‍यांसाठी सुरु केलेल्या किसान सन्मान निधीसह विविध योजनांचा लाभ घ्यावे,असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले.
जवळील कारंजा येथे भारतीय जनता किसान आघाडीच्या वतीने 24 फेबुवारीपासून आयोजित दोन दिवसीय शंकरपटाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.यावेळी त्यांनी आयोजक जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांचे शंकरपट आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री संजय कुळकर्णी,भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम,भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे,भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा भावना कदम, पंस सदस्या चित्रकला चौधरी,देवचंद नागपुरे,धनंजय रिनायत,अशोक जयसिंगानिया,अशोक हरिणखेडे,महेंद्र सहारे,पुरू ठाकरे आदी उपस्थित होते.शंकरपटात मोठ्या संख्येने शेतकरी बैलजोड्या सहभागी झाल्या असून शंकरपटाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.