Home विदर्भ देसाईगंज येथे लाईनमन दिवस उत्साहात साजरा

देसाईगंज येथे लाईनमन दिवस उत्साहात साजरा

0

देसाईगंज,दि.04ः 33 केव्ही वडसा उपकेंद्रात येथे लाईनमन दिवस सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यावर आलेल्या नैसर्गिक संकटात, चक्रीवादळ,पुर ,वारा,पाऊस या सारख्या परिस्थिती मधे सर्व प्रथम त्याचा विज वितरण प्रणाली वर परिणाम होतो व कोविड काळात देशातील नागरिक घरात असताना अशावेळी नागरिकांना विज पुरवठ्याची गरज असते. तेव्हा खरी कसोटी लागते ती महावितरण तांत्रिक कामगारांची. महावितरणचे हे प्रकाशदुत जिवाची पर्वा न करता विद्युत पुरवठा सुरू करतात, म्हणूनच त्याचा कामाची दखल घेऊन देशात 4 मार्च रोजी लाईनमन दिवस पाळण्याच्या सूचना भारत सरकार यांच्या कडून प्राप्त झाल्या होत्या.
या कार्यक्रमामधे उपस्थित विज कर्मचाऱ्यांना विज सुरक्षिततेची शपथ देउन विज सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपकार्यकारी अभियंता श्री.सारवे, श्री. मेश्राम, श्री बागडे ,श्री खोब्रागडे, श्री शेनमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
लाईनमन दिवस कार्यक्रमाला श्री. रडके, श्री राऊत मुख्य लाईनमन वडसा व शहर ग्रामीण विज वितरण केंद्रातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थिती होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली.

error: Content is protected !!
Exit mobile version