जगत महाविद्यालयात ‘जागतिक वन्यजीव दिवस’

0
22

गोरेगाव :-प्राणिशास्त्र विभाग व आय.क्यु.ए.सी. च्या संयुक्त विद्यमाने शहरातील जगत महाविद्यालयात जागतिक वन्यजीव दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. वाय. लंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक वन्यजीव दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य डॉ. एस. एच भैरम, डॉ. व्ही. आय. राणे उपस्थित होते. यावेळी उपस्थित वक्त्यानी वन्यजीवाचे संरक्षण व मानवी जीवनातील महत्त्व तसेच वाढत्या काँक्रीट च्या युगात जंगलाचे होणारे नुकसान व वन्यप्राण्याचा मणुष्य वस्तीकडे होणारी चाहुल भविष्यात धोकादायक आहे. सोबतच या गंभीर बाबीकडे आतापासून लक्ष देवून जंगले व वृक्षतोड थांबली पाहीजे याविषयी सविस्तर माहीती मार्गदर्शनातून देण्यात आली. सोबतच पाॅवरपाईन्ट सादरीकरनाद्वारे उपस्थितांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. संजीव राहांगडाले, आय.क्यु. ए. सी. समन्वयक यानी केले तर आभार डॉ. वसुधा मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.