जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्वारी – चेतना ब्राम्हणकर

0
13

जिल्हा क्रीडा संकुल येथे महिला दिन साजरा

     गोंदिया, दि.9 :  समाजाचा व राष्ट्राचा विकास करायचा असेल तर स्त्रियांनी चुल आणि मुल एवढ्या पूरतेच मर्यादित न राहता उच्च शिक्षण घेवुन जगाचा उद्वार केला पाहिजे. म्हणून तर म्हटलं जात “जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्वारी” असे प्रतिपादन भारत स्काऊट गाईडच्या जिल्हा समन्वयक चेतना ब्राम्हणकर यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट गाईड, अथर्व बहुउद्देशिय संस्था, शिवछत्रपती बहुउद्देशिय संस्था व जिल्हयातील विविध संघटनाच्या संयुक्त विद्यामाने आंतराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल मरारटोली गोंदिया येथे करण्यात आले होते.

         कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन अविनाश बजाज सचिव जिल्हा रायफल शुटींग असो.,  एन. एस. उईके राज्य क्रीडा मार्गदर्शक, अमर गांधी सहसचिव जिल्हा रायफल शुटींग असो., माजी शुभेदार रामदास तांडेकर, माधुरी परमार प्रामुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविकेतून ए. बी. मरसकोले, क्रीडा अधिकारी यांनी आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या उद्देश व 8 ते 25 मार्च 2023 या कालावधीत राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विशेष कार्य करणा-या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार  एन. एस. ईके राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवचरण चौधरी, किसन गावळ, आकाश भगत, जयश्री भांडारकर, नरेंद्र कोचे, विर गहरे, विशाल ठाकुर, विनेश फुंडे, अंकुश गजभिये, अतुल बिसेन यांनी अथक प्रयत्न केले.

व्यवहारात स्त्रियांची समानता अजूनही दूरच-कॉम्रेड हिवराज उके*
 भंडारा -: 8 मार्च 2023 ला भारतीय महिला फेडरेशन व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यमाने भाकप कार्यालय राणा भवन भंडारा येथे महिला मेळावा साजरा करण्यात आला. महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महिला फेडरेशनच्या नेत्या व लेखिका कॉम्रेड प्रियकला मेश्राम होत्या तर प्रमुख मार्गदर्शक भाकपचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलना चे राज्य सहसचिव कॉम्रेड हिवराज उके होते. प्रमुख पाहुणे ओबीसी जनगणना परिषदेचे समन्वयक काॅ. सदानंद इलमेे तसेच महिला फेडरेशनच्या उपाध्यक्ष काॅ. रत्‍नाबाई इलमे, बौद्ध महिला मंडळाच्या  अध्यक्ष काॅ. महानंदा गजभिये होत्या.
 सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाच्या प्रणेत्या कॉम्रेड क्लारा झेटकीन व कॉ.रोझा  लुकझेंबर्ग तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
         याप्रसंगी बोलताना प्रमुख मार्गदर्शक काॅ.हिवराज उकेे  यांनी जागतिक महिला दिनाच्या संघर्षाचा व स्थापनेचा इतिहास सांगितला. तसेच कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय व्यवहारात स्त्रियांची समानता अजूनही दूरच आहे. एवढेच नाही तर स्त्रियांवर अन्याय अत्याचार कमी होण्याऐवजी वाढत चाललेला आहे. गॅस, डिझेल-पेट्रोलचे व विजेचे दर आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे.या देशाच्या राष्ट्रपती महिला असून लोकसभा व विधानसभेत  50 टक्के नव्हे तर 33 टक्के आरक्षण अजूनही मंजूर झालेला नाही. आणि प्रस्ताव प्रलंबित आहे. याबद्दल तसेच स्थानिक मागण्यांकडे प्रशासनाच्या व शासनाच्या दुर्लक्षपणाबद्दल ही काॅ. हिवराज उके यांनी नाराजी व्यक्त केली.
         कार्यक्रमाचे संचालन महिला फेडरेशनच्या अध्यक्ष कॉम्रेड सीमा फुले व आभार भाकपचे तालुका सचिव कॉम्रेड गजानन पाचेे यांनी मानले.
     या प्रसंगी प्रामुख्याने काॅ वामनराव चांदेवार, मोहन सेलोकर, कुंदा गजभिये, मंगला लांजेवार, छबी पाचे, भारती निपाने, भारती मेश्राम, ममता तुरकर, रंजना सेलोकर, संगीता सहारे, उर्मिला वासनिक, ताराचंद देशमुख, ज्ञानेश्वर साखरकर, राजू लांजेवार, गोपीचंद गोमासे, गौतम भोयर, रूखमा चोपकर,श्रीमती पटले, ज्वाला तिरपुडे, माया गजभिये, रेखा थुलकर, गणेश क्षीरसागर, घनश्याम नागोसे, दिलीप क्षीरसागर इत्यादींची उपस्थिती होती.