देवरीला महाले,आमगावला कुंभरे तहसीलदार रुजू होणार,खांडरे चंद्रपूरला जाणार

0
381
गोंदिया,दि.10ःराज्यातील सहा महसूल विभागातील तहसीलदार संवर्गातील बदलीसाठी पात्र असलेल्या तहसीलदाराची बदली यादी महसूल विभागाचे सहसचिव माधव वीर यांच्या स्वाक्षरीने काल दि.९/३/२०२३ ला निर्गमित करण्यात आली आहे.या बदली आदेशानुसार गोंदियाचे तहसीलदार संतोष खांडरे यांची चंद्रपूरला तर देसाईगंजचे तहसीलदार संतोष महाले यांची देवरीत बदली करण्यात आली आहे.साकोलीचे तहसीलदार रमेश कुंभरे यांची आमगाव तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. 
विशेष म्हणजे संतोष महाले 2009 मध्ये यापुर्वी देवरी तहसीलदार म्हणून कार्यरत होते.त्यांच्या कार्यकाळात नैसर्गिक आपत्ती मदत निधी,संजय गांधी निराधार योजना,रजा रोखीकरण सारख्या प्रकरणात झालेल्या निधी अपहार प्रकरणात त्यांचे नाव गुंतलेले राहिले आहे.
    या बदली यादीने “कही खुशी तर कही गम” चा माहोल असून ज्यांना खरोखरंच बदली पाहिजे होती त्यांच्या नावाचा समावेश  नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती.या बदली आदेशाकडे बघितल्यानंतर गोंदियातील अप्पर तहसीलदार हे पद तसेच गोंदिया ग्रामीणचे तहसीलदार पद रिक्तच ठेवण्यात आले आहे.