आमदार रहांगडाले यांच्या हस्ते मोफत चष्मे वितरण

0
17

तिरोडा,दि.११ -तिरोडा गोरेगाव विधान सभेचे आमदार विजय रहांगडाले यांच्या तर्फे तिरोडा तालुक्यातील नागरिकांकरिता २ दिवसीय मोफत आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य महाशिबिरामध्ये तालुक्यातील ८ हजार नागरिकांनी आरोग्य तपासणी केली असून त्यापैकी ११०० नागरिकांनी नेत्र तपासणी केलेली होती. त्यापैकी ३३४ नागरिकांनी चष्मे सूचित केले होते.सदर चष्मे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्हा महामंत्री मदन पटले, तिरोडा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे,शहरध्यक्ष स्वानंद पारधी,प. स.सभापती सौ. कुंता पटले,उपसभापती हुपराज जमाईवार,जि.प.सदस्य चत्रभुज बिसेन,पवन पटले,सौ. माधुरी रहांगडाले, सौ. रजनी कुंभरे,सौ.तुमेश्वरी बघेले,प.स. सदस्य दिपाली टेंभेकर, कविता सोनेवाने, मजूर सहकारी सचिव उमाकांत हारोडे, कृउबास मा.सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले, उपसभापती डॉ.वसंत भगत,संजय बैस,डॉ.बी.एस.राहंगडाले,डॉ.रामप्रकाश पटले,अमोल तीतीरमारे,दिगंबर ढोक,नितिन पराते,प्रकाश सोनकावडे,संजय पारधी,मिलिंद कुंभरे, जीन्तेद्र रहांगडाले, घनश्याम पारधी, तिरुपती राणे, दिनेश चोभर, अनुपजी बोपचे, डिलेश पारधी, नितीन पारधी, नरेंद्र कटरे,राज सोनेवाने, अजित नायर, खुमेश बघेले, भूमेश्वर शेंडे, , जितू टेंभेकर, प्रमोद गौतम आदी उपस्थित होते.