ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गोरेगाव तालुका मेळावा संपन्न

0
11

गोरेगाव- ग्रामपंचायत कार्यालय हिरडामाली येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (संलग्न आयटक) चे गोरेगाव तालुका मेळावा 11 मार्चला पार पडला. अधिवेशनाचे प्रथम सत्र सरपंच महेश चौधरी यांचे अध्यक्षतेखाली उपसरपंच श्यामराव हरिणखेडे यांच्या हस्ते उदघाटनाने झाले.आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉ.हौसलाल रहांगडाले यांचे प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कॉ.मिलिद गणवीर यांनी ग्रामपंचायत कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.या नंतर प्रतिनिधी सत्र ज़िल्हा अध्यक्ष का. चत्रुघण लांजेवर यांचे अध्यक्षतेत तालुका सचिव बुधराम बोपचे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले.अहवालवर कर्मचा-यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मिलिंद गणवीर ( कार्याध्यक्ष राज्य महासंघ), रवींद्र किटे( जिल्हा सचिव), ईश्वरदास भंडारी (अध्यक्ष अर्जुनी मोर.), महेंद्र कटरे (कार्याध्यक्ष गोंदिया तालुका) यांनी मार्गदर्शन केले.मेळाव्यात गोरेगाव तालुका कार्यकारणीची सर्व सम्मतीने निवड़ करण्यात आली. उत्तम डोंगरे (अध्यक्ष),बुधराम बोपचे (सचिव),निलेश मस्के (कार्याध्यक्ष),सोमेश्वर राऊत (उपाध्यक्ष),मिथुन राऊळकर (कोषाध्यक्ष),तुलसीदास चौधरी (संघटन सचिव),हिरोज राऊत (सहसचिव) व ईतर सभासदांचा समावेश करण्यात आला. प्रतिनिधी सत्रात चत्रुघन लांजेवार जिल्हा अध्यक्ष यांनी समारोपीय मनोगत व्यक्त केले. आभार मिथुन राऊळकर यांंनी मानले तर संचालन बुधराम बोपचे यांनी केले.